Crime News | उल्हासनगर येथे 14 वर्षीय मुलीला मारहाण करत केला बलात्कार

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | साकीनाका परिसरातील अत्याचाराची घटना (Mumbai Saki Naka Rape Case) ताजी असतानाच उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करून बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर (Crime News) आली आहे.

शुक्रवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरातील एका पडक्या घरात ही घटना दरम्यान या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी बलात्कार करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.श्रीकांत गायकवाड असं त्याच नाव असल्याचे समजते. शिर्डीहून एका खासगी बसने पीडिता कल्याण येथे आली होती. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकातून तिने उल्हासनगर स्टेशन गाठलं. उल्हासनगर स्कायवॉक वर तिला तिचे दोन मित्र भेटले. त्यांच्याशी बोलत असताना आरोपी हातात हातोडा घेऊन तेथे आला. त्याने पीडितेच्या मित्रांना धमकावले. त्यामुळे पीडितेचे मित्र पळून गेले.

यानंतर आरोपीने या मुलीला स्टेशन परिसरात असलेल्या एका पडक्या घरात नेत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, त्या पडक्या घरात पीडिता होती. त्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन करून आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. दरम्यान कल्याण रेल्वे पोलिसात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Insecure Apps | ‘गुगल प्ले’वर 19 हजारपेक्षा जास्त अ‍ॅप असुरक्षित, अतिशय खासगी माहिती होऊ शकते सार्वजनिक; सुरक्षेचे ‘हे’ 5 उपाय लक्षात ठेवा, जाणून घ्या

SBI ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी, लवकर करा ‘हे’ कामे, अन्यथा…

Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही’, भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून खळबळजनक वक्तव्य, राऊतांनी केला हल्लाबोल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Crime News | 14 year old girl beaten and raped one youth arrested in ulhasnagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update