Crime News | सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन् शिक्षकाने अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ कृत्य

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – वर्धा (Vardha) जिल्ह्याच्या तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका शिक्षकाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार (Crime News) बनवले आहे. हा आरोपी शिक्षक एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी (Death threats) देत अनेकदा तिच्यावर अत्याचार (Crime News) केले. काही दिवसांनी अचानक या पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर, तिला रुग्णालयात दाखल केलं असता ती गर्भवती असल्याचं समजले आणि हे प्रकरण समोर आले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तळेगाव पोलीस ठाण्यात (Talegaon Police Station) फिर्याद दाखल केली आहे.

 

तक्रार दाखल होताच पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराच्या (POCSO) गुन्ह्यासह अन्य कलमाअंतर्गत नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा (Crime) दाखल केला. तळेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी शिक्षकाचे नाव राहुल भारती (Rahul Bharti) असून तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचं शिकवणी केंद्र आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीपासून आरोपी शिक्षकाकडे शिकवणीसाठी जात होती. कोरोना (Corona) विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, मार्चपासून आरोपी शिक्षकानं शिकवणी वर्ग पुन्हा ऑफलाइन पद्धतीनं भरवायला सुरुवात केली होती. आरोपी शिक्षक राहुल भारती हा पीडितेचा गृहपाठ तपासताना तिच्याशी नेहमी असभ्य वर्तन करायचा. तसेच तिला मारहाण देखील करायचा. (Crime News)

सप्टेंबर महिन्यात पोळा सणानिमित्त शिकवणीला दोन दिवस सुट्टी होती.
यावेळी पीडित मुलगी 9 सप्टेंबर रोजी दुपारी चुकून नेहमीप्रमाणे शिकवणीला गेली असता तेव्हा वर्गात एकही विद्यार्थी नव्हता.
यानंतर आरोपी राहुलने हीच संधी साधत पीडितेशी बळजबरी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेल, अशी धमकीसुद्धा दिली. यानंतर आरोपीने 12 सप्टेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजीदेखील तिच्यावर बळजबरीने अत्याचार (Rape) केले. यानंतर काही दिवसांनी अचानक या पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर, तिला रुग्णालयात दाखल केलं असता ती गर्भवती असल्याचं समजले आणि पीडितेच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Crime News | 16 years old minor girl raped by teacher victim become pregnant fir lodged wardha crime

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा नवीन दर

Rakesh Jhunjhunwala | बाजारात प्रचंड घसरण, पण राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोचा शेयर 13% वधारला

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? गोपनीय फाईल चोरल्याप्रकरणी निकटवर्तीयावर FIR