कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिराजवळच तरूणावर 16 सपासप वार करून खून, परिसरात खळबळ
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये एका तरुणावर सत्तूराने सपासप वार करून खून केल्याची खळबळजन घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना कोल्हापूर मधील कागल येथील भरवस्तीत घडली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. असे असले तरी गुन्ह्यांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय विनायक सोनुले असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कागलमधील महालक्ष्मी मंदिरासमोरच हा खून झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी खून केल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय याच्या शरीरावर हल्लेखोरांनी तब्बल 16 सत्तूराने वार केले. वर्मी घाव झाल्यामुळे अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यदर्शींनी या घटनेची माहिती पोलिसांना तातडीने दिली. कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अक्षयचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपींची ओळख पटली नसून पोलीस परिसरातील प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले जाणार आहेत. दरम्यान पोलिसांनी मृत अक्षयच्या कुटुंबाला खूनाची माहिती दिली आहे. पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.