Crime News | केरळच्या बँकेतील 3 कोटींच्या सोन्यावर मारला डल्ला; सातार्‍यातून 4 जणांना अटक

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – केरळमधील एका बँकेतील तब्बल तीन कोटी रुपये किमतीच्या साडेसात किलो सोन्यावर डल्ला मारल्याप्रकरणी (Crime News) साताऱ्यातून (Satara) चार जणांना सापळा रचून अटक (4 Arrest) करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील (bombay restaurant chowk) एका हॉटेलमध्ये करण्यात आली. बँकेतील सोन्याच्या चोरी प्रकरणात (Gold Robbery Case) केरळ आणि सातारा पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई (Crime News) केली. चारही संशयितांना केरळ पोलिसांच्या (Kerala Police) ताब्यात देण्यात आलं असून त्यांना पुढील तपासासाठी केरळला नेण्यात आले आहे.

केरळमधील एका बँकेत काही दिवसापूर्वी चोरी झाली होती. यावेळी चोरट्यांनी बँकेतील तब्बल साडेसात किलो सोन्यावर डल्ला मारला होता. बाजारभावानुसार त्याची किंमत 3 कोटीहून अधिक आहे. केरळ पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा धागेदोरे नाशिकपर्यंत (Nashik) पोहोचले होते. तेथील निक जोशी हा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार (main accused) असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर केरळ पोलिसांचे एक पथक नाशकात आले. पण जोशी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला.

या गुन्ह्यातील आरोपीना गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. निक जोशी (Nick Joshi) हा आपली वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदलत होता. दरम्यान निक हा काही दिवसापासून साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती केरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांचे एक पथक साताऱ्यात दाखल झाले. त्यानंतर सातारा आणि केरळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. संशयित जोशी हा साताऱ्यात महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका हॉटेलमध्ये आपल्या दोन साथीदारांसह तसेच कोरेगाव तालुक्यातील (Koregaon taluka) एका मित्रासमवेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत जोशी आणि त्याच्या सातारा व कोरेगावातील तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ताब्यात घेतल्यानंतर आरोपींची सातारा येथे प्राथमिक चौकशी करण्यात आली.
त्यानंतर सातारा पोलिसांनी (Satara police) चौघांना केरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एक महागडी चारचाकी गाडी देखील जप्त केली आहे.

Web Title :- Crime News | 4 arrest from satara in the connection with gold robbery in bank of kerala

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | संतापजनक ! शिक्षकानं विद्यार्थिनीला लावलं नादाला, कॉलेजला गेल्यानंतर देखील सुरू होतं ‘नाटक’; गावकर्‍यांना समजलं अन्…

Tokyo Olympics | नीरज चोपडाला टक्कर देणारा पाकिस्तानी खेळाडू ‘गोल्ड’च्या रेसमध्ये कोणत्या स्थानावर राहिला? जाणून घ्या

Pune Crime | 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन केला गर्भपात; पिडीतेने विषारी गोळ्या खाल्याने उघडकीस आला प्रकार