Crime News | 7 वर्षाच्या मुलास साखळीने बांधून ठेवायची आई, ड्रग्ज देऊन मारण्यापूर्वी लिहून घेतले – ’मी आहे सर्वात वाईट मुलगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Crime News | ब्राझीलच्या एका भयंकर आईने (Yasmin Vaz dos Santos Rodrigues) केलेल्या अत्याचारांची कथा (Mother Tortured Son) ऐकून तुमचा नक्कीच थरकाप उडू (Crime News) शकतो. ही आई आपल्या 7 वर्षांच्या छोट्या मुलासाठी (7 Year Old Boy Murdered) राक्षसासारखी होती.

या 26 वर्षीय महिलेचे तिच्या मैत्रिणीशी संबंध होते (Lesbian Mother Killed Son). ती लेस्बियन आहे. मुलगा Miguel हरवल्याची तक्रार त्याची आई Yasmin Vaz dos Santos Rodrigues ने दाखल केली होती.
खरं तर Miguel ने स्वताच आपल्या निष्पाप मुलाला अँटीडिप्रेशनचे औषध देऊन बेशुद्ध करून एका डफल बॅगमध्ये भरले आणि नदीत फेकून दिले आणि दोन दिवसानंतर हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

यास्मीन आपली 23 वर्षाची गर्लफ्रेंड Bruna Nathieli Porto da Rosa सोबत राहू लागल्यानंतर छळाचे हे सत्र सुरू झाले.
पोलिसांना एक क्लिपसुद्धा मिळाली आहे ज्यामध्ये मारेकरी आईची गर्लफे्रंड मुलाला धमकावत आहे की, ती आई आल्यानंतर त्याला मार देणार आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, मृत मुलाने मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरीक छळ सहन केला होता.
तो कुपोषित होता. त्याला शाळेत टाकले होते, परंतु तो जायचा नाही, त्याला मित्रही नव्हते.
त्याला घरात एका खोलीत बंद केले जायचे. साखळीने कपाटाला बांधले जायचे.

पोलिसांना एक डायरी सुद्धा मिळाली आहे, ज्यामध्ये मुलाला मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठी त्याच्याकडून लिहून घेतलेला मजकूर आढळला आहे.
मुलाकडून आई लिहून घेत असे की, मी खुप वाईट मुलगा आहे. मी मूर्ख आहे.
मी माझ्या आईसारखी आई मिळण्यासाठी लायक नाही.
मी वाईट आहे, क्रुर आहे आणि मला कुणाचाही सन्मान करता येत नाही.
यास्मीनला मुलाची अडचण झाली होती म्हणूनच तिने हे क्रुर कृत्य केले.

 

Web Title : Crime News | 7 year old boy horribly tortured by his killer mother and her girlfriend forced to write i am an idiot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Modi | खेलरत्न पुरस्काराचे नामकरण म्हणजे राजकीय खेळ; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या वादात महिलेने चावा घेऊन तोडले तरूणाचे बोट, खडकमध्ये FIR

Fact Check | महिन्यात ATM मधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास लागणार 173 रुपयांचा टॅक्स? जाणून घ्या सत्य