Crime News | धक्कादायक ! आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य

धौलपूर : वृत्तसंस्था – धैलापूर याठिकाणी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका जन्मदात्या बापानं आठवीत शिकणाऱ्या आपल्या पोटच्या लेकीवर अत्याचार (Crime News) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. हा नराधम बाप गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीला नरक यातना देत होता. जेव्हा पीडितेच्या आईने याला विरोध केला तेव्हा तो तिलासुद्धा मारहाण (Crime News) करत होता. आरोपी बापाच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं अखेर शाळेतील मुख्याध्यापकाला पत्र लिहून तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती दिली.

 

हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकानं या घटनेची माहिती तात्काळ बाल कल्याण समितीला (Child Welfare Committee) दिली. यानंतर पीडित मुलीच्या आरोपात तथ्य आढळल्यानंतर, बाल कल्याण समितीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून आरोपी नराधम बापावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हि घटना राजस्थानच्या (Rajasthan) धौलपूर या ठिकाणी घडली आहे.

 

पीडितेने आपल्या तक्रारीत तिचे वडील नेहमी तिच्यासोबत गैरवर्तन करून तिच्यावर बलात्कार (Rape) करतात.
या घटनेला आईनं विरोध केला असता, वडील तिलाही मारहाण करत होते.
यामुळे पीडितेने त्रस्त होऊन शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र लिहून आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली.
यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून बारी पोलीस ठाण्यात (Bari Police Station) बलात्कारासह,
विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमासह गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Crime News | 8th std minor student raped by father in dhailpur rajasthan fir lodged girl wright to letter to teacher and pray for help

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा