Crime News | गुजरातमध्येही गुंड ‘गजा मारणे पॅटर्न’ ! तुरुंगातून सुटल्यानंतर गुंडाची वाजत गाजत काढली मिरवणुक

सुरत : वृत्त संस्था – Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (gangster Gajanan marne) याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांची मुंबई -पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) वरुन जंगी मिरवणुक काढण्यात आली होती. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होऊन आता त्याला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

सुरतमध्ये कारागृहातून सुटलेल्या दारु तस्कर गुन्हेगाराचे फटाके फोडून स्वागत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरतमधील लिंबायत या भागात राहणार्‍या कैलाश पटेल (Kailash Patel) नावाचा गुन्हेगार हत्या (Murder)  केल्याच्या आरोपावरुन तुरुंगात गेला होता. रविवारी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याचे मिरवणुक काढून जंगी स्वागत केले. वाटेत फटाके फोडण्यात आले.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दारु तस्करी (Alcohol smuggling) च्या आरोपाखाली एका गुंडाला पोलिसांनी अटक (Arrest) केली होती. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. या तस्काराची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या आरोपावरुन कैलाश पटेल हा तुरुंगात होता. त्याची रविवारी जामिनावर सुटका झाली होती. गुजरातमध्ये दारुबंदी आहे. असे असले तरी संपूर्ण राज्यात दारुची तस्करी मोठ्या प्रमाणावर चालते. सुरतमधील लिंबायत क्षेत्रात दारु तस्करांमध्ये वर्चस्वावरुन नेहमीच वाद होत असतात. त्यातूनच खुन, मारामार्‍या नेहमीच होत असतात.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Crime News | After his release from prison, a gang of thugs took out
a procession like pune’s gajanan marne

हे देखील वाचा

 

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज ! ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन,
जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

MP Sudhir Gupta on Amir Khan | आमिर खानवर BJP खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य,
म्हणाले – ‘आजोबाच्या वयात तिसरी पत्नी शोधतोय, हा अंडी विकण्याच्या लायक’