Crime News | BoB बँकेच्या महिला अधिकार्‍याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, परिसरात प्रचंड खळबळ

झज्जर : वृत्तसंस्था – Crime News | हरयाणामधील बहादुरगडमधील बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) सीनिअर महिला मॅनेजरचा (female branch manager) मृतदेह तिच्या पतीच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून (Dead Body Found Hanging) आला आहे. ही महिला रांची येथे काम करत होती. तर तिचा पती झज्जर जिल्ह्यातील जसोरखेडी गावातील हरियाणा बँकेत (Haryana Bank) कामाला आहे. बहादुरगड मधील सेक्टर 6 पोलीस ठाण्यात (Sector 6 Police Station) मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारावर तिच्या पतीविरोधात हत्येचा गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. मयत महिला बँक ऑफ बडोदाच्या अपना बाजार शाखेत मॅनेजर होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पी सोनम Shilpi Sonam (रा. एचआरसी कॉलनी, रांची) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या अपना बाजार येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत होत्या. तर त्यांचा पती हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील जसोरखेडी गावात हरयाणा ग्रामीण बँकेत काम करतो. शिल्पी सोनमचे भाऊ दीपक कुमार (Brother Deepak Kumar) यांनी सांगितले, तिचा नवरा तिला त्रास देत होता. तसेच नशेच्या ओव्हरडोस घेत असल्याने बहीण सासरी रांची येथे राहत होती. तर राकेश शर्मा बहादुरगडमधील ओमॅक्स सोसायटीत फ्लॅट घेऊन राहतो.

4 सप्टेंबर रोजी शिल्पी सोनम आपली दोन मुलं आणि राकेशच्या भाच्यासह बहादुरगड येथे आली होती.
याठिकाणी आल्यानंतर राकेशने तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान शिल्पिचा मृतदेह पतीच्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
राकेशने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

Web Titel :- crime news | bank of baroda female branch manager body found hanging in jhajjar husband arrested in haryana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3,623 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

National Women Commission | NWC ची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर टीका; चंद्रमुखी देवी म्हणाल्या – ‘मागील 2 वर्षापासून महिला आयोगाची स्थापना नाही’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 234 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी