Crime News | पोटात 42 लाखाचे सोने लपवून दिल्लीला निघाला होता ‘तस्कर’, विमानतळावर ‘गोत्यात’

नवी दिल्ली : Crime News | इम्फाळ विमानतळावर सीआयएफएफ आणि कस्टमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी एका मोठ्या सोने तस्कराला अटक केली आहे. हा तस्कर सुमारे 900 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे सोने ज्याची किंमत जवळपास 42 लाखापेक्षा सुद्धा जास्त आहे, ते पोटातील मलाशयात लपवून घेऊन जात होता, जे पोलिसांनी जप्त (Crime News) केले आहे.

मलाशयात लपवले होते सोने

हा तस्कर इम्फाळहून दिल्लीला जाणार होता. त्याने सुमारे 908.68 ग्रॅम वजनाची सोन्याची पेस्ट असलेली चार पॅकेट आपल्या मलाशयात लपवली होती.

एक्स-रेमधून समजले

अटक आरोपीचे नाव मोहम्मद शरीफ आहे. आरोपी प्रवाशी केरळच्या कोझीकोडीचा राहणारा आहे. तो दुपारी 2:40 मिनिटाच्या विमानाने इम्फाळहून दिल्लीला निघाला होता. अधिकार्‍यांनी सांगितले की, आरोपीला सुरक्षा होल्ड एरियात नेण्यात आले परंतु तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.

यानंतर त्याची मेडिकल केली असता शरीराच्या खालच्या भागात मलाशायात गोल्ड पेस्ट पाहून अधिकार्‍यांनाही धक्का बसला. यानंतर त्याने आरोप मान्य केला. इम्फाळमध्ये सोन्याच्या काळाबाजार नेहमीच सुरू असतो. यापूर्वीसुद्धा 18 जूनला, इम्फाळहून एका अज्ञात वाहनात 43 किलो सोने पकडले होते, ज्याची किंमत सुमारे 21 कोटी होती. यामध्ये सोन्याची 260 बिस्किट पकडली (Crime News) होती.

हे देखील वाचा

Solapur Crime | पुण्यातील ‘विवाहित’ प्रेमी युगुलाची सोलापूर जिल्ह्यातील लॉजवर आत्महत्या; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | पुण्यातील ‘त्या’ कार्यकर्त्याला पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी सीबीआयने केली अटक

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Crime News | cisf and custom officer caught a man with 900 gm gold

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update