Crime News | ऑनलाइन जुगारात कर्जबाजारी झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने मारला लोकांच्या पैशावर डल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crime News | ऑनलाइन जुगारात (Online Gambling) कर्जबाजारी झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने (Railway Staff) कर्ज भागवण्यासाठी लोकांच्या पैशावर डल्ला (Crime News) मारला. इतकच नाही तर चोरी लपवण्यासाठी या कर्मचाऱ्याने दरोडा (Robbery) टाकल्याचा कट रचला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तपासात पोलिसांनी (Police) हा बनाव उघड केला. चेन्नई (Chennai) येथे हि घटना घडली असून तिरुवांम्यूर MRTS तिकीट काऊंटरवर प्रवाशांना तिकीटे देण्याचं काम हा कर्मचारी करतो. टीकाराम (Tikaram) असे त्याचे नाव आहे.

 

तिरुवांम्यूर MRTS तिकीट काऊंटर साधारण पहाटे 4 वाजता किंवा त्यापूर्वी उघडण्यात येतं. ज्या दिवशी हि घटना घडली त्यावेळी तिकीट काउंटर न उघडल्यामुळे प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तिकीट काउंटर उघडले नसल्याने निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी आता मध्ये जाऊन पहिले तर तिकीट विक्री कर्मचारी टीकारामचे (Tikaram) हातपाय दोरीनं बांधून त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून त्याला खिडकीला बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याची सुटका केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पावणे चारच्या सुमारास काउंटर उघडण्यासाठी आत येताच आपल्या मागून 3 दरोडेखोर आले आणि बंदुकीचा धाक दाखवून काउंटरची 1 लाख 32 हजारांची रोकड घेऊन ते पळाले असे टीकारामने पोलिसांना सांगितले. घटनेच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली जेथे घटना घडली तेथे सीसीटीव्ही नव्हते त्यामुळे पोलिसांना स्निफर डॉगची मदत घ्यावी लागली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. (Crime News)

पोलिसांनी परिसरातील अन्य काही सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली. मात्र त्यातूनही काही माहिती हाती लागली नाही.
त्यामुळे पोलिसांनी टीकारामकडे अधिक चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
पत्नीची चौकशी करत असताना तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपणच आपल्या पतीला बांधून घातलं आणि पैसे घेऊन गेल्याची कबुली तिने दिली. दोघांनाही पोलिसांनी (Police) अटक (Arrested) केली असून त्यांच्याकडून चोरलेली 1 लाख 32 हजार रुपये देखील जप्त केले आहेत.

 

Web Title :-  Crime News clerk wife held stage managing railway station robbery

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI ग्राहकांसाठी तीन बातम्या ! दोन दिलासादायक, एक खिशाला कात्री लावणारी

 

Solapur Crime | सोलापूर-विजापूर महार्गावरील ब्रिजला कार धडकली; 4 ठार तर 1 जखमी