Crime News | धक्कादायक ! महिला सैनिकाची गळफास घेऊन आत्महत्या, ‘त्या’ मेसेजने खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुट्टीसाठी घरी आलेल्या एका महिला सैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या (military personnel commits suicide) केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत (Delhi Crime News) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिला सैनिक जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तैनात होती. 2 ऑक्टोबर रोजी ती गोवर्धन येथे आपल्या घरी सुट्टीसाठी आली होती. त्याचवेळी तिने आत्महत्या केली. आत्महत्या (Delhi Crime News) करण्यापूर्वी तीने आपल्या वडिलांना मेसेज (Message) केल्याने ही भयंकर घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय तरुणी दोन वर्षापूर्वी सैन्यामध्ये भरती झाली होती. तिचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तिची पोस्टींग (Posting) जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आली होती. सुट्टीसाठी घरी आल्यानंतर तिने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Crime News) केली. मुलगी घरी आल्याने घरात उत्साहाचे वातावरण होते. मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याने घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. मुलगी रात्री खोलीत झोपण्यासाठी गेली. सकाळी बराचवेळ झाला तरी ती बाहेर येत नसल्याने तिच्या वडिलांनी तिला फोन करण्यासाठी हातात फोन घेतला. त्यावेळी त्यांना मुलीचा मेसेज दिसला.

‘ऐकलं नाही तर कुटुंबीयांनी जीवे मारण्याची दिली धमकी’
तरुणीने आपल्या वडिलांना केलेल्या मेसेजमध्ये प्रवीण नावाचा एका तरुण आपल्याला मानसिक (Mental) आणि शारीरिक त्रास (physical distress) देत आहे.
तसेच त्याने मला नशा (Intoxication) येणारे पदार्थ देऊन माझे अश्लील फोटो (Pornographic photos) आणि व्हिडिओ (video) काढले आहेत.
ते सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) करण्याची धमकी देखील दिली.
जर आपण ऐकलं नाही तर कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे.

 

‘पप्पा, प्रवीणला सोडू नका’
मुलीने मेसेजमध्ये पुढे लिहले की, पप्पा, मी तुम्हाला हे सांगितलं नाही पण 31 तारखेला तो मला गोड बोलून, फसवून त्याच्या घरी घेऊन गेला.
त्याने चार दिवस त्याच्यासोबत मला ठेवलं आणि त्याच दरम्यान नशा आणणारे पदार्थ देऊन माझे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले.
पप्पा, प्रवीणला सोडू नका, त्याला कधीच माफ करु नका, असंही तिने म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

Web Title :- Crime News | crime news military personnel commits suicide in delhi after man viral that kind of video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Update | धनत्रयोदशीपूर्वी 49 हजार रुपयांच्या जवळपास पोहचू शकते सोने, जाणून घ्या काय आहे सर्वात मोठे कारण

High Salary Jobs | देशात पुन्हा परतणार मोठ्या पगाराचा काळ ! सन 2022 मध्ये नोकरदारांना मिळेल 9.3 % पगारवाढ; कंपन्या सुद्धा करतील ‘बंपर’ नियुक्त्या

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,879 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी