क्राईम स्टोरीताज्या बातम्यानवीदिल्ली

Crime News | मुलीला पळवून केलं ‘शुभमंगल’, तरूणीच्या नातेवाईकांनी तरूणाचा चक्क प्रायव्हेट पार्टचं कापून केलं ‘अमंगळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलीला घरातून पळवून नेत प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून संतापलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाचे पोलीस ठाण्यासमोरून (Police Station) अपहरण (Kidnapping) करून सागरपूरला नेऊन तेथे त्याला बेदम मारहाण (Beating) केली. त्याचबरोबर त्याचा प्रायव्हेट पार्टही (Private Part) कापल्याचा धक्कादायक प्रकार नवी दिल्लीत (Crime News) उघडकीस आला आहे. गंभीररित्या जखमी मुलावर सरकारी रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरु असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. राजधानी दिल्लीत (Crime News) घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, लग्न झाल्यानंतर मुलाच्या घरातील व्यक्तींनी पोलीस ठाणे गाठत पोलीस संरक्षणाची (Police Protection) मागणी केली होती. दरम्यानच्या काळात पोलिसांनी तिथूनच मुलीच्या घरच्यांना फोन करुन माहिती दिल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. ज्यावेळी पोलीस ठाण्यातून मुलगा आणि मुलगी बाहेर आले. त्यावेळी त्या दोघांना बळजबरीनं उचलून घेऊन गेले होते. (Crime News)

मुलाच्या घरातील व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील (New Delhi Crime) राजौरी गार्डन टीसी कॅम्प (Rajouri Garden TC Camp) परिसरात 23 वर्षीय युवक कुटुंबासह राहत होता. दिनेश आणि राही (बदलेली नावे ) यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघांनी 15-20 दिवसांपूर्वी घरातून पळून जाउन लग्न केले. त्यानंतर जीवाला धोका आहे असं सांगत बुधवारी संध्याकाळी 5 वाजता राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात (Rajouri Garden Police Station) पोहचले. दोघांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले.

पोलिसांनी मुलीच्या घरच्यांना माहिती दिल्यानंतर तिचे नातेवाईक पोलीस ठाण्याबाहेर जमले. पोलिसांकडून सुरक्षा मिळालीच नाही मात्र पोलीस ठाण्याबाहेरुनच दोघांचं अपहरण करुन सागरपूरला घेऊन गेले. त्याठिकाणी सूरजला बेदम मारहाण करत त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. रक्ताच्या थारोळ्यात सूरजला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सूरजची अवस्था गंभीर असल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकानी केला आहे.

 

अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशांत गौतम (Addi CP Prashant Gautam) म्हणाले की,
सफदरजंग हॉस्पिटलमधून (Safdarjung Hospital) पोलिसांना सूचना मिळाली होती.
पीडित मुलगा राजौरी गार्डन टीसी कॅम्प येथे
राहण्यास होता तर मुलगी सागरपूर परिसरात राहायला होती.
दोघांनी प्रेमविवाह केला होता. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना
माहिती दिल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावत मुलीच्या नातेवाईकांना
दुसरीकडून लग्न केल्याची माहिती मिळाली होती. त्या दोघानांही
जबरदस्तीनं उचलून नेत सागरपूर परिसरात घेऊन गेले.
याप्रकरणी हत्येचा प्रयत्न आणि अपहरण याअंतर्गत गुन्हा (FIR)
दाखल करण्यात आला असून मुलीच्या घरच्यांचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :- Crime News | delhi boy private part was cut after running away home and getting married with girl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bank Holidays List | जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पाहून घ्या सर्व सुट्ट्यांची यादी

Holiday Calendar | सन 2022 मध्ये साप्ताहीक सुट्टीच्या दिवशीच 8 शासकिय सुट्ट्या

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 120 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Back to top button