Crime News | वेब सिरीजच्या नावाखाली पॉर्न व्हिडिओ शूट, अभिनेत्रीची पोलिसांत तक्रार

कोलकाता न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Crime News | राज कुंद्राला अटक झाल्याने भारतातील पॉर्नोग्राफी (Raj Kundra Pornography Case) इंडस्ट्रीचे धाबे दणाणले आहेत. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अनेक पिडित तरुणींनी याविरोधात स्वत:हून पुढे येत अशा लोकांविरोधात आवाज उठवला आहे. दरम्यान, अशाच प्रकारचे एक प्रकरण कोलकाता (Kolkata Crime) येथे समोर आले आहे. कोलकाता (Kolkata Crime) येथील एका अभिनेत्रीला (Actress) वेब सिरिजच्या (Web series) नावाखाली पॉर्न व्हिडिओ (Porn video) शूट करण्यास भाग पाडले. तसेच तिचे व्हिडिओ पॉर्न वेब साईट्सवर (Porn Web Site) व्हायरल केले. याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने कोलकाता येथील न्यूटाऊन पोलीस ठाण्यात (Newtown Police Station) तक्रार दिली आहे. Crime News | forced to do porn the actress lodged a police complaint

एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणीला फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून संपर्क साधण्यात आला.
त्यानंतर तिला ऑडिशनसाठी (Audition) बोलावून घेऊन तिच्याकडून साडीची जाहिरात करुन घेतली. यासाठी तिला तीन हजार रुपये देण्यात आले. यानंतर तिला एका वेब सिरिजची ऑफर देण्यात आली.
ही ऑफर स्विकारुन तरुणी सेटवर पोहचली.
सेटवर तिला कोणतीही वेब सिरिज नसून पॉर्न व्हिडिओ असल्याचे लक्षात आले.

अभिनेत्रीने पॉर्न व्हिडिओ शूट करण्यास नकार दिला. परंतु मेकर्सनी तिच्याकडून जबरदस्तीने पॉर्न व्हिडिओ शूट करुन घेतला.
तसेच हे व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर अपलोड करणार नसल्याचे आश्वासन दिले.
मात्र निर्मात्यांनी हे व्हिडिओ पॉर्न साईट्सला विकले. सध्या ते इंटरनेवर प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीने हे व्हिडिओ रिमूव्ह करण्यासाठी सायबर पोलिसांकडे (cyber police) धाव घेतली आहे.

पीडित अभिनेत्रीने कोलकाता येथील न्यूटाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या तक्रारीत तिने मोइनाक आणि नंदिदा दत्त या दोघांची नावे घेतली आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल होताच दोन्ही आरोपी फरार झाले आहे.
पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणात पीडितेला नक्कीच न्याय मिळवून देऊ असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Web Title : Crime News | forced to do porn the actress lodged a police complaint

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LPG Connection | कुटुंबात कुणाकडे असेल LPG कनेक्शन, तर तुम्हाला सुद्धा मिळेल नवीन कनेक्शन; जाणून घ्या ‘या’ सुविधेबाबत

Pune Crime | लॉकडाऊनमुळे झाला बेरोजगार, लोकांचे पैसे देण्यासाठी केली सोनसाखळीची चोरी; खडक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sharp Mind | ‘सुपर अ‍ॅक्टीव्ह’ मेंदूसाठी ‘या’ गोष्टी खा, स्मरणशक्ती मजबूत होईल; जाणून घ्या