Crime News | ‘चॉकलेट’ खाल्ल्याने एकाचवेळी चार मुलांचा तडफडून मृत्यू

Crime News | Four children died at the same time after eating chocolate

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. चॉकलेट (Chocolate) खाल्ल्याने एकाचवेळी चार मुलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून प्रशासनातील अधिकारीही दाखल झाले आहेत. दरम्यान, घराच्या बाहेर ही चॉकलेट कोणी टाकली होती हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Crime News)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कयासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिसईच्या लठऊर टोला (अनुसूचित जमाती) शी संबंधित असलेल्या दोन कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. मृतांमध्ये दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, घराच्या दारासमोर सकाळी ७ वाजता कोणीतरी चॉकलेट फेकली होती. (Crime News)

ती चॉकलेट या चारही मुलांनी खाल्ली. काही वेळातच ती तडफडू लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार दारात पडलेली चॉकलेट मुलांनी वाटून खाल्ली. त्यानंतर पाच मिनिटातच मुले तडफडायला लागली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. ही चॉकलेट दारात कोणी टाकली हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

Web Title :- Crime News | Four children died at the same time after eating chocolate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा