थेऊर : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणावर कोयत्याने वार

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – थेऊर येथे एका तरुणावर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन कोयत्याने वार करुन जखमी केले असून त्याच्या डोक्यात जखम झाली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल शिवा पवार रा. थेऊर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लक्ष्मण साहेबराव पवार याने अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन विठ्ठल पवार याच्यावर कोयत्याने हल्ला केला त्यामध्ये तो जखमी होऊन त्यांच्या डोक्यात दहा टाके पडले आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, विठ्ठल पवार व लक्ष्मण पवार दोघेही शेजारी राहतात. त्यांचे कुटुंबीय अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन नेहमीच भांडण करत. आज मंगळवार दि 17 सप्टेंबर रोजी विठ्ठल पवार बसस्टॉपवर असलेल्या वाघेश्वर लस्सी येथे लस्सी पिण्यासाठी गेला. लस्सी पिऊन आपल्या मोटरसायकल वरुन निघणार तेवढ्यात लक्ष्मण पवार याने जवळ येऊन शिवीगाळ करत आपल्या हातातील कोयत्याने डोक्यात वार केला व दमदाटी करत पळून गेला. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले.

उपचारानंतर विठ्ठल पवार यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपी आणखी फरारी असून पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे पुढील तपास करीत आहेत.

You might also like