Crime News | हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीने दिला मुलीला जन्म, बदनामीच्या भीतीने केली हत्या, बॉयफ्रेंडवर सुद्धा गुन्हा दाखल

शहडोल : Crime News | मध्य प्रदेशातील शहडोल येथील कस्तुरबा गांधी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणारी मुलगी प्रेग्नंट राहिली. नंतर तिने वसतिगृहातच एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर नवजात बालकाची हत्या करून मृतदेह वसतिगृहाच्या आवारात फेकून दिला. लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. (Crime News)
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. त्यानंतर तपास सुरू केला असता संपूर्ण प्रकरण समोर आले. पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीला तसेच तिच्याशी संबंध असलेल्या तरुणाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पांडवनगर येथील कस्तुरबा गांधी गर्ल्स हॉस्टेलमध्ये २० नोव्हेंबर रोजी वसतिगृहाच्या पाठीमागील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात बालकाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला. (Crime News)
मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, डोक्याला गंभीर मार लागल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांच्या तपासात समजले की, गोहपरू गावात राहणारी १८ वर्षे ६ महिन्यांची मुलगी कस्तुरबा वसतिगृहात राहते. ती बारावीची विद्यार्थिनी आहे. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
दोघांमध्ये संबंध आल्यानंतर मुलगी गरोदर राहिली. यानंतर १८ नोव्हेंबरला तिने एका मुलीला जन्म दिला.
प्रसूतीनंतर मुलीने एक दिवस नवजात बाळाला कसे तरी वसतिगृहात ठेवले.
यानंतर बदनामीच्या भीतीने दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी नवजात अर्भकाला बाथरूममधील शीटवर आपटून ठार केले. हत्येनंतर मृतदेह वसतिगृहाच्या आवारात फेकून दिला.
या प्रकरणी शहडोलचे डीएसपी राघवेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, गल्र्स हॉस्टेलमधील या तरुणीचे
तिच्या ओळखीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांमधील शारीरिक संबंधांमुळे विद्यार्थिनी प्रेग्नंट राहिली,
मात्र विद्यार्थिनीने ही बाब तिच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवली.
वसतिगृहातच विद्यार्थिनीने नवजात बाळाला जन्म दिला.
नवजात बालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे,
मात्र विद्यार्थिनी प्रेग्नंट होती, मग हे हॉस्टेल व्यवस्थापनाला कसे कळले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याशिवाय मुलीची प्रसूती कोणी केली? प्रसूतीनंतर एक दिवस नवजात हॉस्टेलमध्ये असतानाही वॉर्डनला का
समजले नाही? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना अद्याप देता आलेली नाहीत.
Web Title :- Crime News | girl student gave birth to newborn hostel killed her for fear of defamation case filed against accused boyfriend
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….
Nana Patole | खोटारडेपणा अन् चेष्टा हाच भाजपचा खरा चेहरा – नाना पटोले