Crime News | धक्कादायक ! घरी बोलावून एक्स बॉयफ्रेंडने प्रेयसीची केली क्रुर पद्धतीने हत्या; सपासप 7 वार करुन केलं रक्तबंबाळ, अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Crime News | एक्स बॉयफ्रेंडने तरुणीला भेटण्यासाठी घरी बोलावून तिच्यावर चाकूने वार करुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना (Crime News) उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीच्या (Delhi) द्वारका जिल्ह्यात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या तरुणीच्या अंगावर अतिशय क्रुर पद्धतीने वार करून हत्या करण्यात आली आहे. तरुणीचा मृतदेह बघून अनेकांचा थरकाप उडाला आहे. याप्रकरणी कुणीही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली नाही. खुद्द पोलिसांनीच याप्रकरणाची दखल घेत तपासास सुरूवात केलीय.

याबाबत अधिक माहिती अशी, तरुणीच्या एक्स बॉयफ्रेंडनं (Ex Boyfriend) तिला भेटण्यासाठी बोलावलं.
जेव्हा ही युवती तिथे पोहचली तेव्हा दोघांत वाद झाला आणि त्याचवेळी आरोपी तरुणाने चाकूने वार केले.
तर, आरोपी तरुण हा तरुणीच्या शेजारीच राहायला होता. या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते.
तरुणीच्या हत्येची माहिती पोलिसांना हॉस्पिटलकडून मिळाली.
तोपर्यंत कुणीही या घटनेची पोलीसात तक्रार (Crime News) केली नाही. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलीस तपासात आरोपीची ओळख अंकित गाबा (Ankit Gaba) असल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान, घटनास्थळी आरोपीसोबत हिमांशू आणि मनीष नावाची आणखी दोन मुलं होती. तर मृत तरुणी डॉली (Dolly) (वय 24) आहे.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेली तरुणी स्वत: हॉस्पिटलला चालत गेली, पण तिचा जीव वाचू शकला नाही.
अत्यंत गंभीर अवस्थेत तरुणी जेव्हा हॉस्पिटलला पोहचली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र याप्रकरणी तक्रार (Crime News) दाखल झाली नाही.

 

दरम्यान, तरुणीच्या शरीरावर चाकूने 7 वार करण्यात आले होते. ज्यात तिला गंभीर जखमा झाल्या होत्या.
पोलीस या प्रकरणातील आरोपी अंकित गाबा आणि त्याचे दोन साथीदार यांचा शोध घेत आहेत.
सध्या तिन्ही आरोपी फरार आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

 

Web Title : Crime News | girlfriend stabbed death allegedly former boyfriend delhi 7 times stabbing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

केवळ 49 रुपयांत मिळतंय Apple Music चे सबस्क्रीप्शन, मिळेल 90 मिलियन गाण्यांची यादी

Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

Pune Crime | पुण्यात लिलाव भिशीच्या नावाखाली महिलेची 60 लाखांची फसवणूक; पती-पत्नीविरुद्ध FIR