Crime News | गर्लफ्रेंडला ‘वश’ करण्याचा मंत्र देण्याच्या नावावर मांत्रिकाने लावला 43 लाखांना चूना, पोलिसात तक्रार दाखल

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  Crime News | तांत्रिक-मांत्रिकाच्या नादी लागून अनेक लोक मोठ्या संकटात सापडतात. गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुद्धा असेच काहीसे झाले आहे. येथील एका मोठ्या व्यापार्‍याला मांत्रिकाने 43 लाखांना चूना लावला. अहमदाबादमध्ये मकार्बा परिसरात इलेक्ट्रॉनिक गुड्सचे दुकान चालवणार्‍या अजय पटेल यांच्या प्रेयसीने त्यांच्याशी बोलणे बंद केले. यामुळे अजय पटेल खुप चिंतेत होते. काहीही करून त्यांना गर्ल फ्रेंड हवी होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अजय पटेल एका (Crime News) मांत्रिकाकडे गेले.

अनिल जोशी नावाच्या मांत्रिकाशी त्यांची ओळख एका कॉमन मित्रामुळे झाली होती.
या मांत्रिकाने अजय पटेल यांना आश्वासन दिले होते की, तो तंत्र-मंत्राद्वारे त्यांच्या प्रेयसीला पुन्हा त्याच्या जीवनात घेऊन येईल.

यानंतर मांत्रिकाने वेगवेळ्या तंत्रविद्येच्या नावावर पैसे घेतले.
अजय पटेल यांच्यानुसार त्यांनी सर्वप्रथम मे 2020 मध्ये 11,400 रुपये दिले.
यानंतर आतापर्यंत मांत्रिकाला वेगवेळ्या वेळी एकुण 43 लाख रुपये दिले.

मांत्रिकाला पैसे दिल्यानंतर अजय पटेल यांची समस्या सुटली नाही.
यानंतर अजय पटेल यांनी सरखेज पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
मीडियासोबत बोलताना अजय पटेल यांनी म्हटले की, मी सरखेज पोलीस ठाण्यात सर्व पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे.

 

यामध्ये 400 पेक्षा जास्त ऑडियो रेकॉडिंगसुद्धा आहे. मी पैसे ट्रान्सफर केल्याचे सर्व पुरावा सुद्धा दिले आहेत. या फसवणुकीत मांत्रिकाची पत्नी गुरु धर्माजी सुद्धा सहभागी आहे.

मात्र, अजय पटेल यांचा हा सुद्धा आरोप आहे की, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास त्यांना अनेक अडचणी आल्या. पोलिसांनी मदत केली नाही.
सर्व पुरावे देऊनही पोलीस एफआयआर दाखल करत नाहीत.

सरखेज पोलिसांनी अगोदर प्रकरणाचा तपास केला आणि नंतर ही केस घटलोदिया पोलीस ठाण्यात ट्रान्सफर केली.
पटेल यांचे वकील कुलदीप जडेजा यांनी म्हटले की, आम्ही या प्रकरणात पोलीस आयुक्तांकडे न्याय मागणार आहोत.

 

Web Title : Crime news | gujrat man seek help of tantric to get back his estranged girlfriend gets duped rs 43 lakh ahmedabad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | अलिशान गाडी स्वस्तात देण्याच्या बहाण्याने उकळले 43 लाख, 5 जणांविरूध्द गुन्हा
दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

PMRDA | पीएमआरडीएच्या विकासआराखड्यावर आतापर्यंत 26 हजार हरकती

Gold Price Today | सोन्यात घसरणीचा कल सुरूच, चांदीही झाली 515 रुपये स्वस्त, जाणून घ्या आजचे नवीन दर