Crime News | हनीट्रॅपद्वारे दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा गंडा; यवतमाळमधील एकास अटक

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन  Crime News | सोशल मीडियाद्वारे ‘हनीट्रॅप’मध्ये दिल्ली येथील एका नामांकित डॉक्टरला अडकवून तरुणी असल्याचे भासवत दोन कोटी रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉक्टरने यवतमाळ गाठून थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी शनिवारी अवघ्या काही तासांत प्रकरणाचा छडा लावून संदेश अनिल मानकर (२१, रा. अरुणोदय सोसायटी, यवतमाळ) यास अटक केली. त्याला न्यायालयाने ७ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी (Crime News) सुनावली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संदेश मानकरचे इंग्रजी माध्यमातून इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण झाले असून वडिलांचे निधन झालेले आहे.
तर आई वेगळी राहत असल्याने अरुणोदय सोसायटीत एका भाडय़ाच्या घरात राहत आहे.
त्याने येथून फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनन्या सिंग या नावाने बनावट खाते उघडून त्याने दिल्लीतील नामांकित डॉक्टरशी संपर्क साधला. त्यानंतर जवळीक निर्माण करून संदेशने आपण उद्योगपती असल्याचे सांगितले. काही दिवसानंतर बहिणीचे अपहरण झाल्याचे संदेशने डॉक्टरला सांगितले.
तसेच त्याच्याकडे तब्बल दोन कोटींची मागणी केली. त्या डॉक्टरने थेट यवतमाळ गाठले.
अनन्या सिंग हिने सांगितल्याप्रमाणे समर नामक तरुणाकडे डॉक्टरने पैसे दिले.
मात्र त्यानंतर अनन्याचा मोबाईल बंद झाला अन डॉक्टरला शंका आली.
त्यांनी थेट यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार दिली.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सायबर सेल व अवधूतवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून लोकेशनवरून संदेश मानकर याचा शोध घेतला.
त्याला अटक करून घरातून तब्बल एक कोटी ७८ लाखांची रक्कम व काही मोबाईल आदी साहित्य जप्त केले व त्याला अटक केली.
डॉक्टरकडून रक्कम घेणारा समर कोण आहे, डॉक्टरशी बोलताना महिलेच्या आवाजात बोलणारी व्यक्ती कोण, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान, तत्काळ तपासासाठी तपास पथकाला ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

 

Web Title : Crime News | honeytrap gang extorts rs 2 crore from delhi based doctor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jalgaon Crime | नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर; आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्य सुत्रधाराला अटक

Pune Gang Rape | धक्कादायक ! पुण्याच्या वानवडी परिसरात 14 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार, शहरात प्रचंड खळबळ

Rain in Maharashtra | राज्यात 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा