Crime News | पत्नीला जिवंत जाळून पतीची पुण्यात आत्महत्या

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | आपल्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून देवून पसार झालेल्या पतीचा मृतदेह पुण्यात आढळला आहे. पतीने पुण्याच्या आंबेगाव टेकडीवर आत्महत्या (Crime News) केली असल्याचं समोर आलं आहे. राजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव Rajendra Mahadev Jadhav (वय, 55. रा. महाबळेश्वर) असं आत्महत्या (Suicide) केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

याबाबत माहिती अशी, राजेंद्र जाधव (Rajendra Jadhav) हा महाबळेश्वर (Mahabaleshwar) येथे घोडे व्यवसायिक होता. चारित्र्याच्या संशयावरून राजेंद्र याने पत्नी बायना राजेंद्र जाधव (Bayana Rajendra Jadhav) यांच्या अंगावर 1 सप्टेंबर रोजी सकाळी पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. त्यानंतर तो पलायन झाला होता. यानंतर पत्नी बायना ह्या गंभीर झाल्या होत्या. अखेर मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू (Died) झाला होता. यानंतर राजेंद्र जाधव याचा शोध महाबळेश्वर पोलिस (Mahabaleshwar Police) घेत होते.

दरम्यान, पुण्यातील आंबेगाव (Pune Ambegaon) टेकडीवर फिरायला गेलेल्या एका व्यक्तीला (शनिवारी) एका माणसाचा कुजलेल्या आणि डोके नसलेला अवस्थेत मृतदेह आढळला.
त्याने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. तपासानंतर हा मृतदेह राजेंद्र महादेव जाधव याचा असल्याचे उघड झाले.
दरम्यान त्याचा विचित्र अवस्थेत मृतदेह (Crime News) झाला होता.
असं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन धामणे (API Sachin Dhamne) यांनी सांगितले.
तर, रविवारी त्याचा मृतदेह मुलांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाच्या अमिष दाखवून 25 वर्षाच्या तरुणीवर वडकी, लोणावळा, भेकराइनगर येथे नेऊन केला बलात्कार, गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर FIR

Pune Police Crime Branch | ज्लेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने अंगठ्या चोरणारी ‘बबली’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Crime News | Husband commits suicide in Pune by burning his wife alive

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update