Crime News | धक्कादायक ! पतीने पसंतीचा शर्ट शिवला नाही म्हणून पत्नीने गळफास घेऊन संपवलं जीवन

राजस्थान : वृत्तसंस्था – Crime News | राजस्थानच्या कोटा शहरातील (Rajasthan) आमरकेपुरम येथील एक धक्कादायक (Crime News) घटना उघडकीस आली आहे. पतीने आपल्या पसंतीचा शर्ट शिवला नाही म्हणून संतप्त पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. 23 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंजली सुमन (Anjali Suman) असं त्या महिलेचं नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, त्या मृत महिलेचा विवाह दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील मंदसौर येथे राहणाऱ्या शुभमसोबत (Shubham) झाला होता. शुभम कोटा येथे एका खासगी कंपनीत काम करतो. बुधवारी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी शुभम आणि अंजली यांच्यात वाद झाला. पत्नीने आपल्या पसंतीचा शर्ट पतीला शिवण्याचा आग्रह धरला. त्यावरून दोघांमध्ये जोरात भांडण झाले. पती जेवण न करता घरातून बाहेर पडला. यानंतर अंजलीने घरातच गळफास (Crime News) घेतला आहे.

दरम्यान, पती शुभमने अशी माहिती दिली की, मंगळवारी पत्नीने त्याला त्याच्या आवडीचा शर्ट शिवायला सांगितले होते. पण यावरून आम्हा दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मी जेवण न करता दुचाकीने कामावर गेलो. ऑफिसमध्ये असताना पत्नीचा एकदा फोन आला. तिला माझ्याशी बोलायचे होते. पण मी कामात असल्याने घरी आल्यावर बोलतो, असे सांगितले. पण काही वेळानंतर शेजा-यांचा फोन आला आणि त्यांनी अंजली ने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती (Crime News) दिली.

दरम्यान, वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन केले आहे. यानंतर बुधवारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल.
याप्रकरणी अंजलीच्या माहेरच्या लोकांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलिस (Police) करीत आहेत.

हे देखील वाचा

Nitin Gadkari | फडणवीस यांच्याबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावर नितीन गडकरींचा खुलासा, म्हणाले…

Pune Railway Station | दिवाळीत प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनवर येणे पडणार ‘महागात’; रेल्वे प्रशासनाचा नवा नियम

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Dr. Amol Kolhe In PCMC | खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘एन्ट्री’नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ‘अ‍ॅक्शन’मध्ये

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Crime News | husband did not sew shirt of her choice angry wife do suicide in kota of rajasthan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update