Crime News | पती-पत्नीच्या भांडणाचा शेवट क्रूर; जिलेटीनच्या स्फोटाने उडाल्या शरीराच्या चिंधड्या

अहमदाबाद : वृत्तसंस्था – Crime News | अरावली जिल्ह्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या भांडणाचा शेवट इतका क्रूर झाला की याची कोणी कल्पनाही केली नसेल. पत्नीच्या माहेरी जाऊन पतीने पत्नीला मिठीत घेऊन जिलेटीनचा स्फोट घडवून आणला. यामध्ये दोघांच्याही शरीराच्या चिंधड्या उडाल्या असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News)

 

लाला पागी (वय ४५) आणि शारदा लाला पागी असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. लाला पागी यांना पत्नीपासून दूर राहणे अवघड झाले होते. त्यांनी अनेक वेळा पत्नीची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले. ४५ दिवसांपूर्वी शारदानं नवऱ्याचं घर सोडलं आणि अहमदाबादपासून १३५ किमी अंतरावर असलेल्या तिच्या वडिलांच्या घरी म्हणजे माहेरी आली असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. (Crime News)

घटनेसंदर्भात माहिती देताना शारदाचा भाऊ भवन म्हणाला की, नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी माझ्या बहिणीचा छळ केला. त्या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली होती. गुरुवारी रात्री लाला पागी शारदाला भेटण्यासाठी आला होता. त्याने शारदाला घरातून बाहेर बोलावले. शारदा घराबाहेर येताच त्याने तिला घट्ट मिठी मारली. पागीने स्वत: च्या छातीला जिलेटीनच्या कांड्या बांधल्या होत्या. शारदाला मिठी मारताच स्फोट झाला. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. स्फोटाचा आवाज ऐकून घरातील सदस्य बाहेर आले असता. शारदा आणि तिच्या नवऱ्याच्या चिंधड्या उडल्याचे निदर्शनास आले.

 

स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पागी दाम्पत्याला २१ वर्षाचा मुलगा आहे.
पागी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पागी याला जिलेटीनच्या कांड्या कोणी दिल्या होत्या याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Web Title :- Crime News | husband strapped with explosives blows himself up with wife died in a blast

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा