पुणे : फोटो स्टुडीओ फोडला, 66 हजारांचा ऐवज चोरला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, शाहीर अमर शेख चौकातील फोटो स्टुडीओ चोरट्यांनी फोडला. चोरट्यांनी शटर तोडून 66 हजार रुपये किंमतीचे दोन कॅमेरे चोरुन नेले आहेत.

याप्रकरणी महेश गणेश जैसवाल (वय 74, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठतील शाहीर अमर शेख चौकात जैसवाल यांचा फोटो स्टुडीओ आहे. सोमवारी रात्री ते नेहमी प्रमाणे फोटो स्टुडीओ बंद गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी फोटो स्टुडीओचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्या ठिकाणी ठेवलेले 66 हजार रुपये किंमतीचे दोन कॅमेरे चोरून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी फोटो स्टुडीओचे शटर उघडे दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास फरासखाना पोलिस करत आहेत.