धनकवडीत ‘चिप्स’ व्यापाऱ्याला लुटले, चौघांवर FIR दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन –  धनकवडीत चिप्सचे कलेक्शन करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्याला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी लुटल्याची धकाकदायक घटना समोर अली आहे. धनकवडीत रात्री साडे अकरा वाजता हा प्रकार समोर आला आहे. याप्रकणारी ३५ वर्षीय वापाऱ्याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन दुचाकीवरून आलेल्या चौंघांवर गुहा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महतीनुसार, फिर्यादी हे चिप्स व्यापारी आहेत.

दिवसभर दुकानदारांकडून पैसे जमा करतात. दोन दिवसापूर्वी फिर्यादी व त्यांचा भाऊ हे चिप्स चे कलेक्शन करून घरी जात होते. यावेळी रात्री साडे अकरा वाजता येथील पुरोहित सुपर मार्केटजवळ आल्यानंतर अचानक दोन दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या भावाला अडविले. तसेच त्यांच्याजवळ जमलेली १ लाख ६९ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. अधिक तपास सहकार नगर पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com