Crime News | खळबळजनक ! महापौराची गोळ्या झाडून हत्या; भाजप आमदाराचं कनेक्शन?

बिहार / कटिहार : वृत्तसंस्था – Crime News। बिहार (Bihar News) राज्यातील कटिहार (Katihar) शहरातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कटिहारच्या महापौराची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (29 जुलै) रात्रीच्या दरम्यान घडली आहे. शिवराज ऊर्फ शिवा पासवान (Mayor Shivraj Paswan) असे त्या महापौराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करत 4 आरोपीना ताब्यात घेतलं आहे. तर, या हत्या प्रकरणात एका भाजप आमदाराच्या (BJP MLA) नातेवाईकाचं नाव पुढं आलं आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मृत शिवराज पासवान (Mayor Shivraj Paswan) हे गुरुवारी रात्री काम उरकून दुचाकीनं आपल्या घरी येत होते. त्यावेळी वाटेत ओसाड ठिकाणी काही अज्ञात आरोपी दबा धरून बसले होते. शिवराज पासवान हे संतोषी चौक रेल्वे गेट परिसरात पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर तात्काळ हल्ला केला. हल्लेखोरांनी पासवान यांच्या दिशेनं अनेक गोळ्या झाडल्या यातील 3 गोळ्या पासवान यांच्या छातीत लागल्या आहे. त्यात गंभीर जखमी झालेल्या पासवान यांना रात्री उशीरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच शहरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, भाजप आमदार कविता पासवान (Kavita Paswan) यांच्या भाचाचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.
भाच्यासोबत 12 जणांवर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.
आठ आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जमीन खरेदी विक्रीच्या कारणांतून महापौर पासवान यांची हत्या झाली असावी,
असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत. दरम्यान पुढील 48 तासांत हत्येचा खुलासा केला जाईल.
तसेच, अटक केलेले सर्व आरोपी कटिहार शहराच्या आसपासच्या परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी (Police officers) दिली आहे.

Web Title :- Crime News | katihar mayor shivraj paswan murder by gun firing in katihar bihar 4 arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | विकास आराखड्याच्या भूमिकेवर महापौर मोहोळ ठाम ! समाविष्ट गावांचा विकास आराखडा महापालिकेकडेच द्या, महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Homeguards | राज्यातील 42 हजार होमगार्डचं मानधन थकलं, सरकारकडून मानधन न मिळाल्यानं आर्थिक संकट

Gold-Silver Price Today | आज उच्चांकी स्तरावरून 7,817 रुपये ‘स्वस्त’ मिळतंय सोने, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव