Crime News | महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; नायब तहसीलदार ‘गोत्यात’, Facebook वर झाली होती मैत्री

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | कालीमाता परिसरातील नाल्याजवळ महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृतदेह (lady police constable dead body) आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रुची सिंह असे या कॉन्स्टेबलचे नाव असून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नायब तहसीलदाराला (Nayab Tahasildar) चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रुची सिंह या १३ फेब्रुवारीला ड्युटीवर न आल्याने त्यांच्या महिला सहकाऱयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु रुची सिंह यांचा फोन सातत्याने स्विच ऑफ लागत होता. त्यामुळे तक्रार नोंदवण्यात आली. दरम्यान कालीमाता परिसरातील स्थानिक नागरिकांनी नाल्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. रुची सिंहसोबत काम करणाऱ्या सहकारी घटनास्थळी पोहचल्या आणि मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर रुची सिंह यांच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. (Crime News)

नायब तहसीलदाराला चौकशीसाठी घेतले ताब्यात
रुची सिंह या विवाहित असून त्यांचा विवाह सहकारी कॉन्स्टेबल सोबत झाल आहे. सध्या तो कुशीनगर येथील कार्यक्षेत्रात तैनात आहे.
दरम्यानच्या काळात फेसबुकच्या माध्यमातून रुची सिंह यांची प्रतापगडच्या रानीगंज येथील नायब तहसीलदारासोबत मैत्री झाली.
पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या ५ वर्षांपासून दोघेही रिलेशनशिपमध्ये होते.
नायब तहसीलदारही विवाहित असल्याचं समोर आलं असून रुची सिंहने नायब तहसिलदारावर लग्नासाठी दबाव टाकला होता अशी माहिती समोर आली आहे.
प्रेम प्रकरणातून रुची सिंह यांची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नायब तहसीलदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
प्रथमदर्शनी कोणतेही ठोस पुरावे मिळून आले नाही.
परंतु लखनौ पोलीस रुची सिंहचा मृत्यू कसा आणि कधी झाला? तिचा मृतदेह नाल्यात कुणी फेकला? याची उकल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

Web Title :- Crime News | lady police constable ruchi singh dead body found lucknow a friendship with the nayab tehsildar on facebook

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ

 

Pune Crime | फ्लॅटधारकाचा बिल्डरकडून विश्वासघात ! ओम तिरुपती डेव्हलपर्सच्या सागर अग्रवाल, इराण्णा रायचुरकर, संतोष तरस आणि ओमप्रकाश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची CM उद्धव ठाकरेंना विनंती, म्हणाले – ‘संजय राऊतांना जरा आवरा, शिवसेना संपवण्याचा…’