Crime News | रात्री फोडली 3 दुकाने फोडून चोरले केवळ 20 रुपये; पोलिसांनाही समजेना हसावं की रडावं

सीकर : वृत्तसंस्था – Crime News | राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील (Sikar District) फतेहपुरमध्ये चोरीची एक अजब घटना उघडकीस आली आहे. येथील दुर्गा मार्केट मधील (Durga Market) तीन दुकाने एकाच रात्रीत फोडण्यात आली. मात्र केवळ 20 रुपयांची चोरी झाली. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली होती. त्यावरून राजस्थान (Rajasthan Crime) पोलिसांनी चोरट्याला पकडले. चौकशी वेळी या चोरट्याने जी उत्तरे दिली ती एकून पोलिसांना हसावे की रडावे हेच समजत नव्हते. दरम्यान पोलिसांनी या चोरट्याच्या कुटुंबाकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला. (Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुर्गा मार्केटमधील तीन कपड्यांची दुकाने (Clothing Stores) एकाच रात्रीत फोडण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. सकाळी हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसही पोहोचले. त्यांनी दुकानांची पाहणी करून सीसीटीव्ही पाहिले. त्या फुटेजममध्ये हा सर्व प्रकार कैद झाला होता. शिवाय ज्या चोरट्यांने ही दुकाने फोडली त्याची ओळखही पोलिसांना पटली. त्यांनी त्या आधारे तात्काळ आसिफला पकडले. (Crime News)

आरोपीकडे चौकशी केली असता पोलिसांनाही धक्का बसला. कारण आसिफला कुरकुरे खाण्यासाठी 20 रुपये हवे होते. त्यासाठीच त्याने तीन दुकाने फोडल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना हसावं की रडावं हेच समजत नव्हते. अधिक चौकशी केली असता आसिफची मानसिक स्थिती (Mental Condition) स्थिर नसल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी आसिफच्या कुटूंबियांकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

web title : Crime News | man breaks into 3 shops and steals 20 rupees for eating kurkure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा