हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत अमानुष कृत्य केलं आहे. पीडितेला सिगारेटचे चटके देत तिला अँटीसेप्टीक लिक्विड पाजल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. हिंगोलीत ही घटना घडली असून २४ वर्षीय पीडितेने मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा (Crime News) दाखल केला आहे. विविध कलामंतर्गत नऊ जणांवर गुन्हा नोंद करत हा गुन्हा हिंगोली पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पती आकाश वाघमारे, बळीराम वाघमारे, राज टापरे, आदित्य वाघमारे, गंगाराम खिल्लारे, विजय खिल्लारे व अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोलीतील बावनखोली परिसरात राहणाऱ्या आकाश वाघमारे यांने शिक्षक असल्याची खोटी माहिती देऊन मुंबई शिवडी परिसरात राहणऱ्या २४ वर्षीय तरूणीसोबत विवाह केला. लग्नानंतर काही दिवस गेल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींनी पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली. (Crime News)
इतकच नाही तर आकाश हा शिक्षक नसल्याचेही उघडकीस आले. पीडितेला मानसिक धक्का बसला तिने आकाश बरोबर बोलणे बंद केले होते. दरम्यान, लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आकाश पीडितेवर दबाव आणू लागला. तीने नकार देताच आकाशने क्रुरतेचा कळस गाठला. त्याने पीडितेला सिगारेटचे चटके देऊन तिला अँटीसेप्टीक लिक्विड पाजलं आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने थेट आपले माहेर गाठले. शिवडीत आल्यानंतर पतीसह सासरच्या ९ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. पुढील तपास हिंगोली पोलीस करत आहेत.
Web Title :- Crime News | married woman refused to have physical relation husband burn wife with cigarettes in maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bombay High Court | अनिल देशमुख प्रकरणात हायकोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, CBI ला तपास करण्याची मुभा