Crime News | संतापजनक ! गरबा पाहून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – Crime News | मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील धार जिल्ह्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गरबा पाहून घरी परत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही समजते. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, पीडित अल्पवयीन मुलगी बुधवारी (13 ऑक्टोबर) रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गरबा पाहून घरी परत जात होती. तिच्यासोबत तिची चुलत बहीण देखील होती. घरी जाताना वाटेत त्यांना चना आणि गोविंद (Accused Chana and Govind) हे दोघे भेटले. त्यांनी पीडितेच्या बहिणीला दगड मारून तिथून पळवून लावले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याची माहिती एका वृत्तानुसार समोर आली आहे.

दरम्यान, पिडित मुलगी आरोपींपासून सुटका करून कशीबशी ती घरी पोहोचली.
त्यानंतर पिडितेने घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला.
यानंतर तिच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात (Police station) धाव घेतली.
त्या आरोपीविरोधात तक्रार (FIR) दाखल करण्यात आली (Crime News) आहे.
दरम्यान, या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

हे देखील वाचा

Kolhapur Crime | मुंबई पोलीस दलातील पोलिसाने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार, इयत्ता 10 वी ची मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

Pune Police |  पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Crime News | minor girl returning from garba got gang raped in madhya pradesh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update