Crime News | गुंडाचा त्याच्याच मित्राने केला घरात घुसून खुन; कारण समजल्यावर पोलीसही झाले ‘अचंबित’

नागपूर : Crime News | गुंडाचा भर दिवसा लोकांनी मारुन खुन होण्याचा प्रकार नागपूरला नवा नाही. वैमनस्यातून दोन गँगमधील गुंड एकमेकांना नेहमीच जीवे मारण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, केवळ  450 रुपयांसाठी दोघांनी त्यांचा मित्र असलेल्या गुंडाचा भर दिवसा खुन केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याच गँगमधील दोघांना अटक केल्यावर हा प्रकार (Crime News) समोर आला.

गोट्या दुरगुडे व पीयुष पंचबुद्धे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. रमेश ऊर्फ काल्या डांगरे असे खुन झालेल्या गुंडाचे नाव आहे. काल्या डोंगरे याच्याविरुद्ध खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काल्याची गोट्यासोबत जुनी ओळख आहे. काही दिवसांपूर्वी गोट्याने काल्याकडून ४५० रुपये उधार घेतले होते. पैसे परत न केल्याने काल्या संतापला होता. काल्या आपल्या आजीसोबत महाजनपुर्‍यात रहात होता. त्याचे आई वडिल आपल्या दोन मुलांसह दुसरीकडे राहतात. रविवारी सकाळी त्याची  आजी घराबाहेर गेली होती. काल्या एकटाच घरी होता. तो दारु पित होता. त्यावेळी गोट्यासोबत त्याचा पैसे परत करण्यावरुन वाद झाला. त्याचवेळी काल्याचे वडिल नामदेव डोंगरे तेथे आले. परंतु मुलगा दारु पिऊन वाद घालत असल्याचे पाहून ते तेथून निघून गेले. गोट्याही तेथून निघून गेला.

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावले जाणार का?, वडेट्टीवार म्हणाले…

काल्याविरुद्ध अनेक गुन्हे आहेत. त्यामुळे आपल्या जिवाला धोका होण्याची शक्यता गोट्याला वाटत होती. त्यामुळे तो पीयुष याला घेऊन दुपारी साडेतीन वाजता पुन्हा काल्याच्या घरात शिरला व त्याचा खुन केला. काल्या हा अवैध दारु धंदा करीत असल्याने त्यातूनच त्याचा खुन झाला असावा, असा अगोदर पोलिसांचा सशंय होता. त्याच्या वडिलांकडे पोलिसांची चौकशी केल्यावर त्यांना गोट्याबरोबर त्याचा वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी गोट्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर इतक्या किरकोळ कारणावरुन त्यांनी खुन केल्याचे ऐकून पोलीसही अचंबित झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

हे देखील वाचा

Electric Bike | अवघ्या 7 रुपयांच्या खर्चात 100 किलोमीटरपर्यंत धावते ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक, किंमत 50 हजार; जाणून घ्या

Railway Ticket Refund Rules | ट्रेनचे तिकीट कॅन्सल केले तर कापले जातात ‘एवढे’ चार्जेस, जाणून घ्या रेल्वेचे कॅन्सलेशन नियम

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Crime News | murder in nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update