Crime News | PUBG चा टास्क पूर्ण करण्यासाठी आईसह भाऊ बहिणींवर तरुणाने झाडल्या गोळ्या

लाहोर:  पोलीसनामा ऑनलाइन टीम – पब्जी गेमचा (PUBG Game) तरुणांवरील प्रभाव अद्यापही कमी झालेला दिसून येत नाही. या गेममुळे पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतात धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. एका अल्पवयीन मुलाने पब्जीचा टास्क (PUBG Task) पूर्ण करण्यासाठी चक्क आईसह भाऊ आणि दोन बहिणींवर गोळ्या झाडून (Crime News) त्यांना ठार केले.

लाहोरच्या (Lahore) काहना परिसरात हा प्रकार घडला असून आरोग्य कर्मचारी महिला नाहिद मुबारक (Nahid Mubarak) (वय४५), त्यांचा मुलगा तैमूर (Taimur) (वय२२), तसेच १७ आणि ११ वर्षीय दोन बहिणींचा मृत्यू (Death) झाला आहे.

लाहोर पोलिसांनी (Lahore Police) दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा हा पब्जी (प्लेयर अननोन्स बैटलग्राउंड) या गेमच्या आहारी गेला आहे. दिवसभर तो गेम खेळत होता. त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला होता. त्याचे वागणे एखाद्या मनोरुग्णा प्रमाणे झाले होते. नाहिदा मुबारक यांचा तलाक झाला असून दिवसभर मुलगा गेम खेळत असल्याने त्या मुलावर रागवत होत्या. घटनेच्या दिवशीही त्यांनी मुलाला गेम खेळण्यावरून रागवले होते. त्यामुळे मुलाने चिडून जाऊन घरातील कपाटात असलेली पिस्तुल (Pistol) काढून आईसह बहिण-भावांची गोळ्या झाडून (Firing) हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यानंतर हा प्रकार (Crime News) उघडकीस आला. शेजारच्या लोकांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मुलगा आणि गटारात पडलेलं पिस्तुल ताब्यात घेतलं. यावेळी, या सर्वांची हत्या (Murder) कशी झाली हे मला माहिती नाही, असा आरोपीने पोलिसांना म्हटले. नाहिदा मुबारक यांनी कुटुंबाच्या संरक्षणासाठी हि पिस्तूल घेतली होती. मात्र, त्याच पिस्तुलमुळे त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ आली. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगमधून (Online Gaming) घडलेल्या गुन्ह्याचं लाहोरमधील हे चौथं प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title : Crime News | murder of two sisters including mother by a boy while playing pubg in lahore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’