Crime News | बिल्डर निशांत कदम हत्या प्रकरण : पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांच्या मुसक्या आवळल्या

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | विरार पूर्व फुलपाडा-सहकारनगर ठिकाणी बिल्डर निशांत कदम (Builder Nishant Kadam) याचा खुन (murder) करण्यात आला होता. हा खून सोमवार 6 ऑगष्ट रोजी करण्यात आला. जुन्या भांडणाच्या वादातून, दारूच्या पार्टीत कट रचून ही हत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या प्रकरणात 14 पेक्षा अधिक आरोपीचा समावेश असून, विरार आणि गुन्हे प्रकटीकरण युनिट 03 च्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मागच्या 4 दिवसात 10 आरोपींच्या मुसक्या (Crime News) आवळल्या आहेत. तर इतर 4 आरोपी फरार आहेत.

चंद्रकांत चौहान, रोशन तिवारी, अजय शिरसाठ, कैलाश शिरसाठ, प्रकाश राठोड, सब्बास सेख (वय, 31), अभय शिट्टी (वय, 27), अजित सालवे (वय 27) अभिषेक राणा (वय 31), हामीद सेख (वय 39) असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या 10 आरोपींची नाव आहेत. रविवारी रात्री या आरोपीना दारूच्या पार्टीत कट रचून, सोमवारी पहाटे ३ ते साडे तीन च्या सुमारास निशांत कदम या बिल्डर वर लोखंडी रॉड, धारदार हत्याराने वार करून फरार झाले होते.

फरार आरोपींची ओळख पटली असून त्या आरोपी मध्ये राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचा समावेश असल्याचे म्हटलं जात आहे. पण, पोलिसांकडून याला दुजोरा मिळाला नसल्याने हत्याकांडातील सर्व आरोपी पकडल्याच्या नंतरच सर्व खुलासे समोर येणार आहेत. हत्येच्या घटनेनंतर मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस (Vasai Virar) आयुक्त सदानंद दाते (CP Sadananda Date) यांच्या आदेशाने, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त प्रशांत वागुंडे (DCP Prashant Wagunde) यांच्या मार्गदर्शनाखाली, विरारचे वरिष्ठ पीआय सुरेश वराडे (Senior PI Suresh Varade), गुन्हे प्रकटीकरण युनिट 3 चे प्रभारी पीआय प्रमोद बडाख (PI Pramod Badakh) यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र टीम आरोपींच्या तपासासाठी रवाना केल्या होत्या.

दरम्यान, दोन दिवसात 6 तर युनिट 03 ने 2 दिवसात 4 असे 10 आरोपींना ताब्यात घेण्यात विरार पोलिसांना यश आले.
हे सर्व आरोपी वसई, विरार, नालासोपारा, चेंबूर परिसरातून पकडले आहेत.
आणखी यात काही आरोपींचा समावेश असल्याचा निष्पन्न होतंय, त्यांची ओळख ही पाठविण्यात आली आहे.
आणि ते आरोपीची आम्ही लवकरच पकडू असा विश्वास विरारचे वरिष्ठ पीआय सुरेश वराडे (Senior PI Suresh Varade) यांनी दिली आहे.

Web Titel :- crime news | nalasopara builder nishant kadam murder case 10 accused arrested so far

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 241 नवीन रुग्ण, जाणून इतर आकडेवारी

Pune Rains | आगामी 5 दिवस पुण्यात ‘मुसळधार’ पाऊस ! IMD कडून अलर्ट’

Pune Crime | खंडणी अन् बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या मनोहर मामा भोसलेला अटक; सातार्‍याच्या लोणंदमधून एलसीबीनं घेतलं ताब्यात