Crime News | आई-वडील आणि बहिणीनेच केली 25 वर्षीय तरुणाची ठेचून हत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Crime News | साखरपुडा झाल्यनंतरही दुसऱ्या मुलीसोबत चॅटिंग करतो या कारणावरून आई-वडील आणि बहिणीनेच एका २५ वर्षीय तरुणाची भिंतीवर डोकं ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेश मधील बुरहानपूर जिल्ह्यात ही घटना घडली असून रामकृष्ण सिंग असे या तरुणाचे नाव आहे. (Crime News)

याबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) संखाराम सेंगर यांनी दिलेली माहिती अशी की, रामकृष्ण सिंग बेपत्ता झाली असल्याची तक्रार सिंग कुटूंबियांनी दिली होती. त्यानंतर ५ जानेवारीला रुपारेल नदीत (Ruparail River) हातपाय बांधलेल्या अवस्थेत रामकृष्ण सिंगचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली. मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस केले, त्यातून मृताच्या कुटुंबाचा त्याला मारण्यात सहभाग असल्याचे काही संकेत आढळले. त्यानुसार रामकृष्णचे वडील भीमन सिंह, आई जमुनाबाई आणि बहीण कृष्णाबाई यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. (Pune Crime)

रामकृष्ण हा बेरोजगार होता. त्यामुळे कुटूंबीय नाराज होते. तसेच तो साखरपुडा होऊनही दुसऱ्या मुलीसोबत बोलत होता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर नाराज होते. २ जानेवारीला रामकृष्ण आणि कुटूंबियांची वादावादी झाली होती. त्यातूनच वडिलांनी त्याला ढकलून खाली पाडले, नंतर त्याचे डोके भिंतीवर ठेचले. तो मेला आहे हे समजून आई-वडील आणि त्याच्या बहिणीने त्याचे हात पाय बांधले आणि त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला अशी कबुली कुटुंबियांनी दिली. याबाबतचे वृत्त एका हिंदी वाहिनीने दिले आहे.

Web Title : Crime News | parents killed son for chatting with girl despite being engaged in mp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Pune Crime | तडीपार गुंडांनी चायनीज स्टॉल चालकाला धमकावून उकळली खंडणी; पुण्याच्या विमाननगर परिसरातील घटना