Crime News | भर पोलीस चौकीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

अहमदाबाद : वृत्तसंस्था – Crime News | गुजरातमधील (Gujarat) एक संतापजनक घटना उघडकीस आली (Crime News) आहे. पोलिसांनीच एका महिलेवर (Woman) अत्याचार करत पोलीस चौकीतच (Police Station) बलात्काराचा (Attempted Rape) प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. एका गुन्ह्याचा तपास करण्याच्या निमित्ताने पोलिसांनी एका विवाहित आदिवासी महिलेला पोलीस ठाण्यात आणलं आणि तिच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील उदयपूरमध्ये पोलिसांचे (Udaipur Police) संतापजनक कृत्य उघडकीस आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, सहाय्यक उपनिरीक्षक राजकुमार (ASI Rajkumar) आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार (Police Constable Jitendra Kumar) यांनी एका प्रकरणात एक विवाहित महिला आणि तिच्या आईवडिलांना अटक (Arrested) केली होती. त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात बसवलं. तसेच त्यांच्याकडून अनेक कामे करुन घेतली. त्यांना स्वयंपाक करायला लावला आणि भांडीही घासून घेतली धक्कादायक बाब म्हणजे यावेळी एकही महिला पोलीस उपस्थित नव्हती. अशात कायदेशीर बाबीला धुडकावत महिलेला पोलिसांनी डांबून ठेवले. यानंतर हे दोन्ही पोलीस अधिकारी महिला आणि तिच्या आई वडिलांना घेऊन 2 दिवस गुजरातच्या विविध भागात फिरत राहिले. (pune Crime)

पोलीस कॉन्स्टेबलने महिलेवर बलात्कार (Attempted Rape) करण्याचाही प्रयत्न केला. आईवडिलांना वेगळ्या खोलीत ठेवून महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु, तरुणीच्या आईने आरडाओरडा करत मध्यस्थी करून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेबाबत समजताच तेथील गावक-यांनी पोलीस ठाण्यात (Police station) फोन करून याला आक्षेप घेतला. महिला पोलीस नसताना महिलेला रात्रभर ठाण्यात कसं ठेवलं? असा जाब विचारताच दोन्ही पोलीस अधिकारी घाबरले आणि शहर सोडून पळ काढला.

 

दरम्यान, सहाय्यक उपनिरीक्षक राजकुमार (ASI Rajkumar) आणि
पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार (Police Constable Jitendra Kumar)
यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, जितेंद्र कुमारला निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे.
याप्रकरणी चौकशी डीएसपी पातळीवरून करण्यात येत आहे.

 

Web Title :- Crime News | police constable tried to rape a woman in police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | राज्यात पेपर फुटीची मालिका सुरुच, आर्मी भरती प्रक्रियेचाही पेपर फुटला; CBI कडून 4 जणांना अटक

Monthly Income Scheme | बँकेपेक्षा जास्त मिळेल व्याज, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 1000 रुपये करा जमा

फक्त 9 हजारात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिस्क ब्रेकसह Yamaha Fascino 125 स्पेशल एडिशन करा खरेदी; मिळेल 68 kmpl मायलेज