Crime News | खळबळजनक ! चक्क 12 वर्षांच्या मुलीने थेट पोलीस अधिकारी पित्याचीच केली हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crime News | एक खळबळून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 12 वर्षाच्या मुलीने तिच्या 13 वर्षाच्या मैत्रिणीसोबत मिळून जन्मदात्या पित्याचाच (Crime News) खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खरंतर या मुलीचे वडिल हे एक पोलिस अधिकारी आहेत. संबधित मुलीनं आपल्या बापाची चाकुने भोसकुन हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हत्येमागचं कारण जाणून आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, ही खळबळजनक घटना ब्राझीलमध्ये 15 ऑक्टोबर रोजी घडली आहे. येथील सांता कॅटरिना येथील नेफे लुईझ वेरलंगच्या (Nephew Louise Verlang) (वय 46) हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी 2 मुलींना अटक (Arrested) केली. त्यापैकी एक 12 वर्षांची आहे, तर दुसरी 13 वर्षांची आहे. 12 वर्षीय आरोपी मुलगी मृत पोलीस अधिकारी वेरलांग (Dead police officer Verlang) यांची मुलगी आहे. तिने तिच्या मैत्रिणीसोबत मिळून आपल्याच वडिलांची चाकूने भोकसून हत्या (Crime News) केली आहे.

मुलींनी ही हत्या करण्याचं कारण म्हणजे त्यांना सुसान लुईस वॉन रिचथोफेनसारखे प्रसिद्ध व्हायचं होतं.
या मुलींनी प्रसिद्धीसाठी हा खून केल्याचे सांगण्यात येत आहे.
या विक्षिप्त मुलीला 2002 च्या खून खटल्यापासून प्रेरणा मिळाली (सुसान लुईस वॉन रिचथोफेन प्रकरण) असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, 20 वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये सुझान (सुझान लुईस वॉन रिचथोफेन) नावाच्या मुलीने तिच्या पालकांची हत्या केली होती.
सुझानने तिचा मित्र आणि प्रियकराच्या मदतीने ही हत्या केली होती. या 12 वर्षांच्या मुलीला या प्रकरणासारखे काहीतरी करायचे होते,
जेणेकरून ती लवकरात लवकर प्रसिद्ध होईल. यासाठी तिनं सुझानसारखे आपल्या आई-वडिलांना ठार मारण्याचे नियोजन केले.
दोन्ही मुलींनी आपला गुन्हा कबूल केलाय. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

 

Web Title :- Crime News | police officer father killed by 12 years old daughter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nawab Malik | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांचे समीर दाऊद वानखेडेंबद्दल 2 खळबळजनक ट्विट, म्हणाले – ‘पहचान कौन’

NCB officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंच नवाब मलिकांना उत्तर; म्हणाले – ‘जन्मदाखला माझ्या मूळ गावी जा आणि तपासा’

Multibagger Stocks | 4.45 रूपयांचा हा शेयर झाला 998 रुपयांचा, एक वर्षात दिला 22,300% चा रिटर्न; गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 2.24 कोटी

Pune Corporation GB | तुकाई दर्शन येथील पाण्याच्या टाकीचे पाणी ‘महंमद वाडी’ला वळविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – माजी महापौर वैशाली बनकर (व्हिडीओ)