Crime News | मध्यप्रदेशातील शिवसेना महिला नेत्याच्या घरात सुरु असलेल्या सेक्स रॅकटचा पर्दाफाश, महिला नेत्यासह 10 जण गजाआड

मध्य प्रदेश – Crime News | शिवसेना (Shivsena) महिला नेत्याच्या घरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश (prostitute Racket) केला आहे. पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Crime News) करुन 5 मुली, 5 ग्रहाकांसह महिला मॅनेजर आणि चालकाला अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई मध्य प्रदेशातील सीहोर (Sehore Madhya Pradesh) येथे करण्यात आली. या कारवाईत ज्या महिलेला अटक करण्यात आली आहे ती स्वत:ला समाजसेविका असल्याचे सांगते. तसेच तिने शिवसेनेच्या तिकीटावर नगरपालिकेची निवडणूक (Municipal election) देखील लढवली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अनुपमा तिवारी (Anupama Tiwari) यांच्या घरामध्ये सेक्स रॅकेट (Crime News) सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तिवारी यांच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी या ठिकाणी सेक्स रॅकेट सुरु असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या छापेमारीबाबत अत्यंत गुप्तता पाळली होती त्यामुळे तेथून कुणालाही पळून जाता आले नाही. याकारवाई पोलिसांनी 5 मुली आणि 5 ग्राहकांना ताब्यात घतले. घटनास्थळी पोलिसांना नशेचे काही सामान मिळाले. या सर्व मुली भोपाळच्या (Bhopal) असल्याचे सांगण्यात येत आहे. इंदुलता नावाची महिला मॅनेजर त्यांना या ठिकाणी घेऊन येत होती.

 

कोण आहे अनुपमा तिवारी ?

अनुपमा तिवारी ही समाजसेविका असल्याचे सांगते. 2015 च्या निवडणुकीत तिने शिवसेनेच्या तिकिटावर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. नेहरू युवा केंद्राकडून (Nehru Youth Center) काही वर्षांपूर्वी योगाचार्य (Yogacharya) म्हणून तिचा सन्मान केला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमी त्या समोर येऊन विधानं करत होत्या. पोलिसांनी सर्वांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला असून घरातून 28 हजारांची रोकड आणि 2 कार जप्त केल्या आहेत.

 

आरोपींची कसून चौकशी

पोलिसांनी पकडलेल्या मुलींना भोपाळमधून आणले जात होते. महिला मॅनेजर इंदुलता या मुलींना घेऊन रुमवर येत होती.
प्रत्येक ग्राहकाकडून 500 रुपये घेतले जात होते. अनुपमा मुळची होशंगाबाद येथील रहिवासी असून सीहोर हे तिचे सासर आहे.
3 महिन्यांपूर्वी ती इंदूरमधून परतली होती. अनुपमाच्या पतीचे 2018 मध्ये निधन झाले आहे. दारूबंदी विरोधात ती मोहिम चालवायची.
2015 च्या निवडणुकीत तिला केवळ 694 मते मिळाली होती.
पोलीस ताब्यात घेतलेल्यांकडे सखोल चौकशी करत असून यामधून आणखी खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

Web Title :- Crime News | prostitute racket exposed mp 10 arrested including shiv sena woman leader

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा