शहरात मारहाणीच्या घटनांमध्ये किरकोळ वाढ

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात संचारबंदीतून थोडी सूट मिळताच सुरू झालेल्या मारहाणीच्या घटना सलग दुसऱ्या दिवशी देखील घडल्या आहेत. कोंढवा, अलंकार आणि हडपसर भागात या घटना घडल्या असून, पूर्ववैमनस्य आणि किरकोळ कारणावरून हे वाद होत आहेत.

हडपसर येथील भांडणात अल्ताफ मुलाणी (वय 19, रा. सय्यदनगर) हा तरुण जखमी झाला आहे. लहान मुलांची भांडणे सोडविल्याने त्याच्यावर वार केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी नासीर शेख, तालिम खान (दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास सय्यदनगरमध्ये लहान मुलांची भांडणे सुरू होती. त्यावेळी तिथे थांबलेल्या मुलाणीने मुलांची भांडणे सोडवली. त्यामुळे एक मुलगा रडत घरी गेला. त्याने मुलाणीने मारहाण केल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर नासिर शेख आणि खान यांनी मुलाणी यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. अधिक तपास उपनिरीक्षक डोंबाळे तपास करत आहेत.

दुसरी घटना कोंढाव्यात घडली आहे. भांडणात मध्ये पडल्याच्या रागातून चार जणांनी एकावर कोयत्याने वार केले. रोहन कामठे (वय २३, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन दिवसांपुर्वी रोहन कामठे आणि त्याचा मित्र अक्षय आवारे टिळेकरनगर परिसरातून दुचाकीवर चालले होते. त्यावेळी दोन दुचाकीववरून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी रोहनला शिवीगाळ केली. भांडणात कोणताही संबंध नसताना त्याच्यावर कोयत्याने वार केले. उपनिरीक्षक चव्हाण हे तपास करत आहेत.

तसेच अलंकार परिसरात पूर्वी झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्यामुलावर दगडफेक करत त्यांचे डोके फोडण्यात आले. वनिता शेडगे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. बुधवारी रात्री परिसरात गोंधळ होत असल्याने त्या बाहेर आल्यानंतर परिसरात काहीजण एकमेकांमध्ये दगडफेकून मारहाण करत होते. त्यावेळी फिर्यादी यांचा मुलगा संकेत हा देखील बाहेर आला असता यातील आरोपींनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करत फिर्यादी यांच्या डोक्यात दगड फेकून मारले. अधिक तपास उपनिरीक्षक गोरे हे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like