नादुरुस्त कार चोरट्याने चक्क क्रेन लावून नेली चोरुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरु असलेला जोरदार पाऊस, त्यात रस्त्यातच बंद पडलेली गाडी व जवळपास गाडी दुरुस्त करुन देऊ शकेल, असे कोणी नसल्याने त्यांनी आपली चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला लावली व घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते मॅकेनिकला घेऊन आले. पण गाडी तेथे दिसून आली नाही. आजू बाजूला चौकशी केल्यावर चक्क चोरट्याने क्रेन लावून ही कार चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार पुणे नाशिक रोडवरील चाकणजवळील हॉटेल महादेव समोर नुकताच घडला. याप्रकरणी चालक शरद सिताराम बवे (वय ३३, रा. चिखली, ता. हवेली) यांनी चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

ते पुणे नाशिक रोडने जात असताना ६ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांची टोयाटो इनोव्हा गाडी बंद पडली. गाडीची क्लच प्लेट खराब झाल्याने ती सुरु तर व्हायची पण गिअर पडत नव्हते. त्यामुळे त्यांनी ती गाडी रस्त्याच्याकडे लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता ते मॅकेनिकला घेऊन गाडी घेण्यासाठी आले असताना गाडी तेथे नव्हती. त्यांनी आजू बाजूला शोध घेतला. टोलनाक्यावरील सीसीटीव्हीची तपासणी केल. त्यातही ती आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी चाकण पोलिसांकडे चोरीची फिर्याद दिली आहे.

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like