Crime News | 28 वर्षीय तरुणाने 15 वर्षीय मुलीवर महिनाभर केला लैंगिक अत्याचार

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन –  Crime News | मलकापूर (Malkapur) शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर महिनाभरापासून बलात्कार (Rape) केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक (Crime News) केली आहे. भूषण गजानन बोरसे असं त्याच नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलकापूर शहरातील मताम्हाकली नगरात भूषण बोरसे राहतो. पीडितेला ब्लॅकमेल करून त्याने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचे सत्र कित्येक दिवसापासून सुरु होते. या बाबत कोणाला काही सांगू नये म्हणून पीडितेला भूषणने जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच परिवारातील सदस्यांना मारून टाकण्याच्या सतत धमक्या पीडितेला देत होता. अखेर सततच्या त्रासला कंटाळून पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मलकापूर पोलिसांमध्ये (Malkapur Police Station) धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी भूषण बोरसेला अटक (Crime News) केली आहे.

 

Web Title : crime news | rape on 15 years girl in malkapur of buldhana district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुणे जिल्ह्यात पिकतोय पहिल्यांदाच ‘निळाकाळा भात’; हार्ट अटॅकपासून बचावासाठी उपयुक्त

Chandrakant Patil | ‘माझ्या मनात शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता, एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

BMC Election | भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; शिवसेना नगरसेवकाचा दावा 

Babanrao Lonikar | ‘महाविकास आघाडीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात’

Atul Bhatkhalkar | ‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’; भातखळकरांचा शरद पवारांना टोला

Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका