Crime News | पतीच्या निधनानंतर वृद्ध पत्नीनेही केली 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – Crime News | येथील हिरानंदानी इस्टेटमध्ये पतीचे गंभीर आजाराने निधन झाल्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या ६७ वर्षीय पत्नीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. यु के गीता असं या वृद्धेचं नाव आहे. या हृदयद्रावक घटनेनं परिसरात हळहळ (Crime News) व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुरुषोत्तम नाम्बियार कुटुंब मूळचे केरळचे असून ते हिरानंदानी इस्टेट मधील ए वन हाऊसिंग सोसायटीमध्ये सातव्या मजल्यावर राहत होते. काही दिवसांपासून ते गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांचा मुलगा कॅनडावरून त्याचबरोबर मुलगी आणि जावईदेखील घरी आले होते. गुरुवारी सकाळी ८.१५ वाजात पुरुषोत्तम यांचे निधन झाले. दरम्यान, याबाबत यु. के. गीता यांना समजताच त्यांना पतीच्या निधनाचा मानसिक धक्का बसला. त्यातूनच त्यांनी ८.३० वाजता घरातील हॉलच्या गॅलरीतून खाली उडी मारली.. ही बाब घरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांना तत्काळ उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Congress | राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभा की विधानसभेवर संधी? काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

Pune Crime | आयटी कंपनीच्या मालकाकडून 9 लाखाची खंडणी घेणाऱ्या कुख्यात गजा मारणे टोळीच्या हस्तकाला गुन्हे शाखेकडून अटक

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित

ITR Filing Date Extended | करदात्यांना दिलासा ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

Permanent License Exam | पुण्यामध्ये पर्मनंट लायसन्सची परीक्षा रविवारीही होणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Crime News | shock of husbands death the woman jumped from the 7th floor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update