Crime News| धक्कादायक ! दोघांमध्ये ‘फाटल्या’नंतर रागाच्या भरात गर्लफ्रेन्डनं केला बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड हल्ला, डोळा कामातूनच गेला

केरळ : वृत्तसंस्था – Crime News | केरळमधील (Kerala) इडुक्की जिल्ह्यातील आदिमाली या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत इडुक्की येथील एका तरुणाचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत (girlfriend) ब्रेकअप (breakup) झालं होतं. यानंतर ब्रेकअपमुळे नाराज झालेल्या गर्लफ्रेंडनं तरुणावर अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) केला. या अ‍ॅसिड हल्ल्यात (Crime News) तरुणाला आपला एक डोळा गमवावा लागला आहे. या तरुणावर तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हि घटना 16 नोव्हेंबर रोजी घडली आहे.

 

हाती आलेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पूजापुरा येथील रहिवासी अरुण कुमार (Arun Kumar) यांच्यावर आदिमाली इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय शिबानं (Shiba) अ‍ॅसिड हल्ला केला. या अ‍ॅसिड हल्ल्यात (Acid Attack) अरुण कुमार यांना आपला एक डोळा गमवावा लागला आहे. शिबा हि अरुण कुमारची गर्लफ्रेंड होती. या दोघांचे ब्रेकअप झाल्यामुळे शिबाला या गोष्टीचा राग आला. अरुण कुमार आणि शिबा यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. नंतर या ओळखीचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. पण काही काळानंतर या दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर अरुण कुमारनं दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानं शिबा नाराज झाली होती.

या गोष्टीचा तिला इतका राग आला कि तिनं याच रागातून हा टोकाचा निर्णय घेतला. हि घटना मंगळवारी 16 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शिबाने 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास अरुण कुमार यांना आदिमाली इरुम्पुपालम ख्रिश्चन चर्चमध्ये (Aadimali Irumpupalam Christian Church) बोलावले. यानंतर शिबाने अरुणच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं. अ‍ॅसिड फेकताना शिंतोडे उडल्यानं शीबाचा चेहरा आणि हातही भाजले आहेत. या घटनेचे व्हिडिओ फुटेजसुद्धा समोर आले आहे. यानंतर आदिमाली पोलिसांनी गुन्हा (Crime News) दाखल करून शिबाला ताब्यात घेतलं आहे. पीडित अरुणवर तिरुअनंतपुरम येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

 

Web Title :- Crime News | Shocking! After the ‘split’ between the two, the angry girlfriend attacked the boyfriend with acid, the eye went out of work.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tadoba National Park | वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Vinod Tawde | माजी मंत्री विनोद तावडे यांचे अखेर पुनर्वसन ! भाजपने दिली मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

Dr. Amol Kolhe | राज्याच्या तिजोरीच्या सक्षमतेवर मुख्याध्यापक अन् शिक्षकांचे निर्णय अवलंबून – खासदार डॉ.अमोल कोल्हे (व्हिडिओ)