Crime News | नगर अर्बन बँक शाखा व्यवस्थापकाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चा

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | विषारी औषध सेवन केल्याने नगर अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (58 रा. भातकुडगाव ता. शेवगाव) यांचा मृत्यू झाला असून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून नगर अर्बन बँक विविध गैरप्रकारांमुळे चर्चेत आहे. शिंदे यांच्या मृत्यूकडे या दृष्टीकोनातून सुद्धा पाहिले जात आहे. शेवगाव शाखेचा सोने तारण गैरव्यवहार उघडकीस आला असून याच तणावातून शिंदे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

मंगळवारी दुपारी गोरक्षनाथ शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. शिंदे नगर तालुक्यातील भातकुडगाव येथे राहतात. दुपारी ते शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विषारी औषध सेवन केल्याने शिंदे यांचा मृत्यू झालाचे सांगण्यात आले. याप्रकरणी शिंदे यांचे चुलत भाऊ कचरू शिंदे यांनी पोलिसांत खबर दिली. मृत्यूपूर्वी शिंदे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे बोलले जात आहे, परंतु अद्याप पोलिसांनी यास दुजोरा दिलेला नाही.

नगर अर्बन बँकेत गैरप्रकार आणि तत्सम तक्रारींमध्ये वाढ झाल्याने संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतल्याचा धक्कादायक गैरव्यवहार उघडकीस आला होता. यासंबंधीच्या तक्रारी अनेक दिवसांपासून सुरू असूनही त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नव्हते.

गैरव्यवहार आणि तक्रारींबाबत शिंदे यांनी 2018 मध्येच बँक मुख्यालयाला कळवले होते परंतु दखल घेतली गेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
तारण सोन्याचा अलीकडेच लिलाव ठेवण्यात आला होता.
त्यावेळी ते बनावट असल्याचे आढळून आले.
बँकेने यासंबंधी पोलिसांत तक्रार देण्यात आली.

या लिलावाच्यावेळीही प्रशासक आणि काही सभासदांमध्ये सुद्धा वाद झाले होते.
मोठ्या कालावधीपासून बँकेत सुरू असलेल्या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे.
आधीच राजकारण पेटलेल्या या सहकारी बँकेत आता शिंदे यांच्या आत्महत्येमुळे नवीन मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Titel :- Crime News | suspicious death of nagar urban bank branch manager police recorded the accidental death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे पालिकेतील नगरसेवकांची ‘पोलखोल’, पालिकेच्या पैशांवर नगरसेवकांची सुरु असलेली ‘चमकोगिरी’ उजेडात

Pune Rural Police | गुंड गणेश रासकर खुन प्रकरणात फलटणच्या गौरव लकडेला अटक, मिरेवाडी शिवारातील ऊसात होता लपला

Governor Bhagat Singh Koshyari | अवघ्या अर्ध्या तासात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी आटोपला चिपळूण दौरा; परत मुंबईला रवाना