Crime News | प्रेमप्रकरणातून 17 वर्षीय मुलाचं गुप्तांग कापूण केलं ठार; प्रियसीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार

पाटणा : प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या (Murder) केल्याची घटना बिहारमधील मुझफ्फरपूरजवळील सोनरबरसा (Crime News) घडली. रामपूर येथील 17 वर्षीय सौरभ कुमार हा प्रियसीला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रेयसीच्या कुटुंबीयांनी या दोघांना पहिले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. धक्कादायक म्हणजे सौरभला प्रियसीच्या कुटुंबाने मारहाण तर केलीच पण त्याचा गुप्तांगही (private part) कापले. दरम्यान, आरोपींनी खासगी रुग्णालयात सौरभला दाखल (Crime News) करून त्याच्या कुटूंबियांना माहिती देऊन पसार झाले. सौरभच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच ते संतप्त झाले. त्यांनी त्याच्या पार्थिवावर प्रेयसीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार केले.या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी २३ जुलै रोजी सौरभ हा सोनरबरसा येथे प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी या दोघांनाही बोलताना मुलीच्या कुटुंबीयांनी पाहिले. त्यानंतर सौरभला मारहाण करण्यात आली. यामध्ये सौरभ गंभीररीत्या जखमी झाला. त्या परिस्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरभच्या कुटुंबीयांनाही याची माहिती देण्यात आली. मात्र उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाला. संतप्त झालेल्या सौरभच्या कुटुंबीयांनी प्रियसीच्या घरासमोरच सौरभच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. जमावाने आरोपींच्या घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तणावजन्य स्थिती पाहून गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. हत्येप्रकरणी सुशांत पांडेय ऊर्फ विजय कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपीच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

हे देखील वाचा

Yashika Anand | दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच मृत्यू

Pune Rain | पुणे महापालिकेकडून नदीकाठच्या ‘या’ परिसरांमधील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या यादी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Crime News | teen killed private part chopped funeral performed outside house accused

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update