Crime News | दुर्देवी ! हैदराबादमध्ये भंगार गोदामाला लागलेल्या आगीत 11 मजुरांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Crime News | तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील (Hyderabad) भाईगुडा परिसरात एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागल्याची घटना (Crime News) घडली. ही घटना बुधवारी पहाटे 3 वाजता घडली असून या आगीत 11 मजुरांचा होरपळून मृत्यू (Died) झाला आहे तर एक मजूर गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. मृतांमधील सर्वजण बिहार (Bihar) येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या अपघातस्थळी दाखल झाल्या.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार गोदामामध्ये पहिल्या मजल्यावर 12 मजूर झोपले होते. त्यानंतर तळमजल्यावर अचानक आग लागली. गोदामातून बाहेर पडण्याचा रस्ता तळमजल्यावरच असल्याने कोणालाही बाहेर पडता येत नव्हते. कसाबसा एक मजूर तेथून बाहेर पडला. तो गंभीर जखमी आहे. त्याच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही आग इतकी भीषण होती की 11 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती फायर कंट्रोल रुमला पहाटे 3 वाजता मिळताच हैदराबादच्या सेंट्रल झोनचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर तीन तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं डीसीपी (DCP) यांनी म्हटलं आहे. (Crime News)

 

 

 

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, आग लागण्याचे कारण फायबर केबल असल्याचे समोर येत आहे. सुरुवातीला फायबरच्या केबलला आग लागली. त्यानंतर आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य निर्माण झाले. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. भंगाराच्या गोदामात बॉटल, कागद, प्लास्टिक असं इतरही सामान असल्याने आग आणखी पसरली. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले असून याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

 

Web Title :- Crime News | telangana fire bhoiguda fire accident many people killed alive in hyderabad fire scrap godown

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा