Crime News | मुलीच्या दाखल्यासाठी आलेल्या आईला करायला लावला मसाज; हेडमास्तर तडकाफडकी निलंबित

बंगळुरू : वृत्तसंस्था – Crime News | बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीची शाळेत अ‍ॅडमिशन (Admission) करण्यासाठी आलेल्या तिच्या आईकडून मुख्याध्यापकाने मसाज करवून घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. ही घटना तेथील महापालिका शाळेत (Municipal school) घडली असून संबधित घटनेचा व्हिडीऔ आणि फोटो प्रसारीत झाले आहेत. दरम्यान याप्रकरणाबाबत समजताच पालिका प्रशासनाने लोकेशप्पाला (Headmaster Lokeshappa) निलंबित (Suspended) करण्याचा निर्णय घेतला (Crime News) आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आपल्या मुलीचा या शाळेत दाखला करवून घेण्यासाठी तिची आई तिच्यासोबत कोदंडरामपुरा येथील बंगळुरू महानगरपालिका शाळेत आली होती. मुख्याद्यापक लोकेशप्पाने (Headmaster Lokeshappa) या महिलेकडून मसाज करवून घेतला. लोकेशप्पाने आपण या महिलेला मसाज करायला सांगितले होते असं कबूल देखील केलं आहे. लोकेशप्पाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे विशेष आयुक्त शंकर बाबू रेड्डी (Commissioner Shankar Babu Reddy) यांनी दिली आहे. दरम्यान, लोकेशप्पा हा बदनाम असून कामचुकारपणा करणे, कामकाजाच्या वेळेत खासगी कामे करणे, अशा त्याच्या विविध तक्रारी (Crime News) देखील आल्या होत्या.

दरम्यान, अ‍ॅडमिशनसाठी तिची आई शाळेत लोकेशप्पाला जाऊन भेटली होतीय लोकेशप्पाने या महिलेला तू नोकरी धंदा काय करतेस असं विचारलं होतं. यावेळी महिलेने आपण ब्युटी पार्लर चालवतो असं सांगितलं होतं. हे ऐकल्यानंतर लोकेशप्पाने तिला मसाज करायला सांगितलं. हे ऐकल्यानंतर महिलेला धक्काच बसला होता, मात्र दबावापोटी तिने मसाज देण्याचं कबूल केलं होतं. त्यावेळी लोकेशप्पाने शाळेतील सर्व शिक्षकांना बाहेर जायला सांगितलं आणि एका वर्गात या महिलेला बोलावून मसाज करायला लावला. दरम्यान लोकेशप्पाने यावेळी आपला शर्ट काढला होता असं देखील म्हटलं जात आहे.

Web Titel :- Crime News | The mother who came for the girl’s test was made to do massage; Headmaster Tadkaphadki suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांची राज्यपालांना विनंती; म्हणाल्या – ‘महिला सुरक्षेच्या संदर्भात BJP च्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या’

Mumbai Crime | प्रसिद्ध बालरोगतज्ञाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Pune Metro Recruitment 2021 | ‘पुणे मेट्रो’मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; पगार 2.5 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या