Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून; विरारमधील धक्कादायक घटना

विरार : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | विरार पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीत सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवजात बालिकेला इमारतीवरून खाली फेकून दिल्याचे समोर आले आहे. सोसायटीतील अन्य रहिवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्वरित बालिकेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात (arnala police station) गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम यशवंत नगर परिसर शिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीचा परिसर आहे. या परिसरातील ट्युलिप सोसायटीत सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आतील मोकळ्या जागेत स्थानिक रहिवाशांना एक नवजात बाळ आढळून आलं होतं. इमारतीवरून कोणीतरी हे बाळ फेकल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. बाळाला अनेक ठिकाणी दुखापत झाली होती. त्याला कपड्यात गुंडाळून स्थानिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसेच अर्नाळा पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान स्थनिकांनी दिलेल्या माहितीनुसार या बाळाला या सोसायटीत कधीही पहिले गेले नाही. तसेच कोणत्या मजल्यावरून फेकले गेले आहे याचीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे हे बाळ कोणाचे आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. उपचारादरम्यान, काही वेळात या बाळाचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

हे देखील वाचा

‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देण्याची केली घोषणा

Satara Crime | दुध टँकरची 6 वाहनांना धडक; पुण्यातील दोघांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Crime News | threw a newborn baby from a highbrow society building in virar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update