Crime News | महिलेने पोलिसाशी घातली हुज्जत, उद्दामपणा दाखवत म्हणाली – ‘शुद्धीत रहा, नाही तर वर्दी उतरवून टाकेन’ (Video)

लखनऊ : वृत्तसंस्था –  Crime News | उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (Lucknow) मध्ये भररस्त्यात कॅब ड्रायव्हरला मारहाण करणार्‍या मुलीनंतर आता आणखी दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. उत्तराखंडच्या नैनीतालहून (Nainital) फिरायला आलेली महिला, लेडी एसआयसोबत झटापट करू लागली (Woman tried to scuffled with Woman SI). तसेच या महिलेने एका पोलीस कर्मचार्‍याला वर्दी उतरवण्याची धमकी (Crime News) सुद्धा दिली.

काय आहे पूर्ण प्रकरण ?

पोलीस नैनीतालच्या तल्लीतालमध्ये नियमित चेकिंग करत होते तेव्हा हिमाचल नंबरची एक कार तिथे पोहचली, तिच्या काचेवर ब्लॅक फिल्म लावली होती.
ड्यूटीवरील महिला पोलीस उपनिरीक्षक राजकुमारी सिंघानिया यांनी नियमानुसार ती हटवण्यास सांगितले, यानंतर कार चालक भडकला आणि महिला पोलीस कर्मचार्‍याशी गैरवर्तन करू लागला.

पोलिसांना केली शिविगाळ

महिला आणि तिचे इतर साथीदार पोलिसांना शिविगाळ करत होते आणि झटापट करत होते.
पोलिसांना उद्दामपणा दाखवत कारमध्ये बसलेल्या पर्यटकांनी पैसे घेऊन सोडण्यास सुद्धा सांगितले.

वर्दी उतरवण्याची दिली धमकी

महिलेचा उद्दामपणा इतका वाढला की तिने महिला अधिकार्‍याला धमकावत म्हटले, तुझ्या लायकी नाही की या गाडीचे चलान फाडशील.
इतकेच नव्हे तिने पोलीस कर्मचार्‍याला वर्दी उतरवण्याची धमकी दिली.

स्थानिकांनी बनवला व्हिडिओ

महिला म्हणाली जर पैसे हवेत तर सांगा, गाडीला काही करू शकत नाही.
घटनास्थळी असलेल्या लोकांनी या हा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर वायरल होत आहे.

 

महिलेवर स्थानिक लोक भडकले

रस्त्यावर गोंधळ वाढल्यानंतर स्थानिक लोक बचावासाठी जमले.
पर्यटकांनी स्थानिक लोकांची किंमती दोन कवडीची असल्याचे म्हटले,
आणि म्हटले तुमच्या सारखे लोक आमच्या घरात साफसफाई करतात.

त्यानंतर लोक भडकले. पोलिसांनी प्रकरण वाढत असल्याचे पाहून अतिरिक्त फोर्स मागवून स्थित नियंत्रणात आणली.
पोलिसांनी पर्यटकांची 6 कोटीची गाडी जप्त केली.

या कलमांतर्गत दाखल केला गुन्हा

पोलीस ठाण्याचे प्रमुख विजय मेहता यांनी माहिती दिली की, दिल्लीच्या वसंत विहार येथे राहणारे शिवम मिश्रा, विवेक आणि संदीप यांच्यासह कानपुर येथे राहणारी महिला स्मिता यांच्याविरूद्ध शिवीगाळ,
सरकारी कर्मचार्‍यांना धमकावणे आणि सरकारी कामात अडथळ आणण्याच्या आरोपात भादविं कलम 504, 506, 353, 186 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title : Crime News | tourists tried to scuffled with woman si in nainital over black film issue police seized rs 6 crore car and filed case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Viral Video | बारामती : गोळीबार अन् ‘मोक्का’मधून जामिनावर सुटलेल्या माजी सरपंच जयदीप तावरेंना ‘दुग्धभिषेक’ (व्हिडिओ)

Pune Municipal Corporation | राज्य सरकारला हाय कोर्टाचा दणका; महानगर नियोजन समितीला दिली स्थगिती