Crime News | ज्वेलरी शाॅपमध्ये चोरट्यांचा गोळीबार; सोने आणि रोख रक्कम हिसकावून पसार

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | हैदराबाद शहरात जबर चोरीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी ज्वेलरी दुकानात गोळीबार करत सोने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला आहे. या अंदाधुंदी गोळीबारात ज्वेलरी स्टोअरचा मालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चोरीच्या बहाण्याने गोळीबाराचा प्रयत्न केलेल्या दोन अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या घटनेबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Crime News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद शहरातील नागोळे येथील स्नेहापुरी कॉलनीतील महादेव ज्वेलर्सच्या शाॅपमध्ये रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. दोन अज्ञात व्यक्ती ग्राहक असल्याचे भासवून दुकानात शिरले आणि दुकान मालकाला काही दागिने दाखवायला सांगितले. त्याचवेळी त्यांच्यातील एकाने दुकानाचे शटर खाली करून रिव्हॉल्व्हरच्या धाकात दुकानातील कामगारांना त्यांच्या बॅगमध्ये सोने आणि रोख रक्कम भरण्यास सांगितले. (Crime News)

 

चोरट्यांच्या या मागणीला कर्मचाऱ्याना धुडकावून लावले असता दोघांपैकी एकाने व्यक्तीने तीन राऊंड गोळीबार करून ज्वेलरी शाॅपचे मालक कल्याण चौधरी यांच्या चेहऱ्यावर आणि ज्वेलरी दुकानातील कर्मचारी राजकुमार सुखदेव यांच्या खांद्यावर गोळी झाडत त्यांना जखमी केले. सुखदेव हा कर्मचारी त्यावेळी महादेव ज्वेलर्समध्ये दागिने देण्यासाठी आला होता परंतु चोरट्यांच्या हाती तो सापडला.

स्थानिकांकडून या घटनेबाबत कळताच चैथन्यापुरी पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून आरोपी राज्यातून पळून जाण्यापूर्वी त्यांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे, असे यावेळ एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसते की हल्लेखोर 30 ते 35 वयोगटातील होते आणि ते जवळच्या गल्लीत उभ्या असलेल्या दोन दुचाकींमधून पळून गेले होते.
जवळपासच्या गल्ल्या आणि स्टोअरमधील फुटेज तपासले जात आहेत आणि सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

पोलिस पुढे म्हणतात, हल्लेखोर उत्तर भारतीय राज्यातील हिंदी भाषेत बोलत असल्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
घटनास्थळी सापडलेल्या गोळ्यांच्या आवरणांच्या आधारे,
आरोपींनी देशी बनावटीची बंदूक वापरल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून नेल्याने ज्वेलरी स्टोअरचा मालक आणि
अन्य एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Web Title :- Crime News | two injured burglars open fire hyderabad jewellery store decamp with gold and cash

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर