Crime News | पोलिसांत तक्रार दिल्याचा घेतला अजब सुड; दोघांनी घरात घुसून महिलेसोबत केलं विकृत कृत्य

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – Crime News | धुळे शहरातील एक अजब आणि धक्कादायक प्रकार (Crime News) समोर आला आहे. पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणातून दोंघांनी एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग (Debauchery) केला. इतकंच नाहीतर नराधम आरोपींनी स्वयंपाकघरातील चालू गॅसवर उलथणी गरम करुन पीडित महिलेच्या हाताला चटके दिलेत. त्याचबरोबर पतीसह मुलांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. ही घटना शहरातील नचबारी परिसरात घडली आहे. या प्रकरणावरुन चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात (Chalisgaon Road Police Station) एफआयआर (FIR) दाखल झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, काही दिवसांआधी पीडित महिलेने संबंधित आरोपींविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात (Dhule Taluka Police Station) गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पीडित महिलेने तिच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार दिली होती. याच रागातून बदला घेण्यासाठी आरोपींनी विचित्र कृत्य केलं. योगेश रामदास पिंजन (Yogesh Ramdas Pinjan) आणि जयदीप सखाराम पिंजन (Jaideep Sakharam Pinjan) (दोघे रा. सोनेवाडी) असं गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत. संबंधित आरोपींनी पीडितेच्या घरात बळजबरीने शिरुन त्या महिलेबरोबर लज्जास्पद कृत्य केलं आहे. एका आरोपीनं पीडित महिलेचे दोन्ही हात घट्ट पकडले, तर अन्य एका आरोपीनं स्वयंपाक घरात सुरू असलेल्या गॅसजवळ पडलेली उलथणी गरम करून पीडितेला गरम चटके (Crime News) दिले.

 

दरम्यान, या घटनेनंतर पीडित महिलेनं चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात (Chalisgaon Road Police Station)
2 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यानंतर पोलिसांनी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

 

Web Title :- Crime News | Two men enters in victims home molestation and beating her for file fir against them in dhule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा