Crime News | योगी सरकारमधील अधिकाऱ्याची महिला कर्मचाऱ्यावर शारीरिक बळजबरी; लैंगिक शोषण करतानाचा Video Viral

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – Crime News | उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील एक धक्कादायक प्रकार समोर (Crime News) आला आहे. योगी सरकारमधील (Yogi government) अपरसचिव स्तरावरील अधिकारी आपल्या महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) करत असल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. इच्छा राम यादव (Ichcha Ram Yadav) असे व्हिडिओतील व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लखनऊ येथील पोलिस ठाण्यात (police station) संबधित अधिका-याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पंरतु अटक केल्याची कुठलीही माहिती अजुन समोर नाही.

 

 

 

 

अल्पसंख्याक कल्याण विभागात सचिव म्हणून तैनात असलेल्या व्यक्तीला आपल्या महिला कर्मचाऱ्यावर शारीरिक बळजबरी (Physical coercion) करताना पकडण्यात आले आहे. हुसैनगंज पोलीस ठाण्यात (Hussainganj police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हा व्हिडिओ पीडितेने शूट केला आहे. तिची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी चेहरा ब्लर करण्यात (Crime News) आला आहे. अशी माहिती पत्रकार अरविंद चौहान (Journalist Arvind Chauhan) यांनी व्हिडिओ शेअर करत ट्विटद्वारे दिली आहे.

 

 

 

दरम्यान, इच्छा राम यादव या महिलेवर जबरदस्ती करताना दिसत आहेत. पीडित महिलेने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही क्षणांनंतर, ते महिलेला जबरदस्तीने चुंबन घेण्यासाठी एका कोपऱ्यात ढकलताना दिसून आले. पुढे काही सेकंदाने इच्छा राम यादव हे तोंड पुसताना दिसले. हे सर्व व्हिडिओतून दिसत आहे महिलेने सांगितले की इच्छा रामने तिला बाथरूममध्ये येण्यास सांगितले आणि ‘त्याच्यासोबत मजा कर असे देखील म्हणले होते.

 

 

दरम्यान, या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर
उत्तर प्रदेश पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी इच्छा राम यादववर आयपीसी नूसार गुन्हा (FIR) नोंदविला आहे.
या अमानुष घटनेमुळे योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे.

 

Web Title :- Crime News | UP Yogi government official jailed for sexually abusing female colleague

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा